एक्स्प्लोर
गोविंदाचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा अकस्मात मृत्यू
मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवारी पहाटे जन्मेंद्र बेशुद्धावस्थेत आढळला होता. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांचा पुतण्या जन्मेंद्रचा अकस्मात मृत्यू झाला. वयाच्या 34 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे त्याला प्राण गमवावे लागले. जन्मेंद्र हा गोविंदाचा भाऊ आणि निर्माते कीर्ती कुमार यांचा मुलगा होता.
मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवारी पहाटे जन्मेंद्र बेशुद्धावस्थेत आढळला होता. पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. कीर्ती कुमार यांनी जन्मेंद्रला दत्तक घेतलं होतं.
जन्मेंद्रने गोविंदाची मुख्य भूमिका असलेल्या 'जहा जाईयेगा हमे पाईयेगा' (2007) या सिनेमाचं दिग्दर्शक केलं होतं. त्यापूर्वी प्यार दिवाना होता है सिनेमासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शन केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
