एक्स्प्लोर

अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागली, ICU मध्ये दाखल, तात्काळ शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती कशी?

Govinda Gun Fire : दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होती. त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Govinda Gun Fire : अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांच्याकडून मिसफायर (Govinda Gun Misfire) झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली आहे. 

दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होती. त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंधेरीच्या क्रिटी केयर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. 

गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, गोविंदा यांच्या मुलीनं एबीपी न्यूजशी बोलताना त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गोविंदा यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे चाहते चिंतेत असून गोविंदा यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 

गोविंदा यांच्या मुलीनं दिली हेल्थ अपडेट

गोविंदा यांची मुलगी टीना आहूजा यांनी एबीपी न्यूजशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. टीना आहूजा यांनी सांगितलं की, मी आता रुग्णालयात आहे, पप्पांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता मी जास्त बोलू शकत नाही. पण, पप्पांची तब्येत आता स्थिर आहे. गोळी लागल्यानंतर पप्पांचं ऑपरेशन करण्यात आलं असून ऑपरेशन यशस्वी पार पडलं आहे. सर्व तपासण्या डॉक्टरांकडून सुरू आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आले असून रिपोर्ट्सही व्यवस्थित आहेत. कमीत कमी 24 तास पप्पांना आयसीयूमध्ये ठेवणार आहे. 

नेमकं काय घडलं? 

गोविंदा यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होते. त्यामुळे नेमकं काय घडलं हे स्पष्ट होत नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार, ते सकाळी बाहेर जाण्यासाठी आपल्या गाडीनं बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली, असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, असं सांगितलं जात आहे की, गोविंदा पहाटे घरात एकटेच होते. ते आपली बंदूक साफ करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसली. 

दरम्यान, गोविंदा यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ : Govinda Gun fire : गोविंदावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार, स्वत:च्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Govinda Gun Misfire: मोठी बातमी: अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी घुसली, रुग्णालयात उपचार सुरु, मिसफायर झाल्याचा संशय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget