एक्स्प्लोर

Dalip Tahil: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला दोन महिन्यांचा तुरुंगवास; कोणत्या प्रकरणी ठोठावली शिक्षा?

Dalip Tahil: दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीप ताहिल यांना 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dalip Tahil:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दलीप ताहिल (Dalip Tahil) यांच्या  पाच वर्षांपूर्वीच्या  ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा आज निकाल आला आहे. दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीप ताहिल यांना 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना 2018 साली घडली आहे, जेव्हा दलीप ताहिल हे दारूच्या नशेत असताना गाडी चालवत होते आणि त्यांची कार एका ऑटोला धडकली. या घटनेत एक महिलाही जखमी झाली. 

नेमकं प्रकरण काय?

हे  ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरण 2018 चे 5 वर्षे जुने आहे. जेनिता गांधी आपल्या मित्रासोबत रिक्षाने जात होत्याय त्यावेळी दलीप ताहिल यांच्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडकल्यामुळे ते पकडले गेले. 'धडक दिल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो, तेव्हा कार दलीप ताहिल चालवत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला. ताहिल यांनी गाडीबाहेर येऊन वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्या मित्राला धक्काबुक्की केली.' असं जेनिता गांधींनी जबानीत लिहिलं. या प्रकरणी दलीप ताहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी अभिनेता दलीप ताहिल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.  नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी हा खटला सुरूच होता. अशा परिस्थितीत आता या खटल्याचा निकाल आला आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका रिपोर्टनुसार, त्यावेळी मुंबईतील खार पोलीस स्टेशनच्या एका इन्स्पेक्टरने सांगितले होते की, दलीप ताहिल यांनी रक्त तपासणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर पोलिसांनी वैद्यकीय उपचार केले. त्यानंतर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीपला अटक करण्यात आली आणि नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. 

दलीप ताहिल यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलंय काम

दलीप ताहिल यांनी  बाजीगर ,  राजा, फिर भी दिल है हिंदुस्तानी , भाग मिल्खा भाग, रा.वन,  इश्क , रा.वन ,  कहो ना प्यार है आणि  सोल्जर  यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Dalip Tahil : दलीप ताहिल म्हणाले, 'वय 31, लग्नही झालं नव्हतं अन् साकारली आमिरच्या वडिलांची भूमिका'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget