एक्स्प्लोर
VIDEO : आमीर खानची 'दंगल'साठी अफाट मेहनत, ट्रेनिंगचा व्हिडीओ रिलीज
मुंबई : बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. सगळीकडेच आमीर आणि दंगल सिनेमाचं भरभरुन कौतुक होत आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी आमीर खानने प्रचंड मेहनत घेतली आहे.
यूटीव्ही मोशन पिक्चर्सने शूटिंगदरम्यान आमीरने केलेल्या ट्रेनिंगचा व्हिडीओ यूट्यूबवरुन शेअर केला आहे. आमीर खानने कुस्तीतले डावपेच शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत प्रशिक्षण पूर्ण केलं.
पाहा व्हिडीओ :
वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या ‘दंगल’ सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 155 कोटींपर्यंत मजल मारली आहे. पाच दिवसात 155 कोटींची कमाई करुन बॉलिवूडमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.
गजनी, थ्री इडियट्स, धूम-3, पीके आणि आता दंगल, असे आमीर खानचे एकूण पाच सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement