एक्स्प्लोर
सलमानचं विधान दुर्दैवी आणि असंवेदनशील : आमीर खान
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बलात्कार पीडित वक्तव्याबाबत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननेही प्रतिक्रिया दिली आहे. "मला असं वाटतं की सलमानचं वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे," असं आमीर म्हणाला.
महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच
मुंबईत दंगल सिनेमाच्या पोस्टर रिलीज कार्यक्रमात आमीर खानला सलमानच्या टिप्पणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आमीर म्हणाला की, "त्याने हे विधान केलं त्यावेळी मी तिथे नव्हतो. मीडियातल्या बातम्याच मी वाचल्या आहेत, ज्या सलमानच्या वक्तव्याबाबत आहेत. मला वाटतं त्याचं विधान अतिशय दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे."सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान
याबाबत सलमानला काय सल्ला देशील, असा प्रश्नही आमीरला विचारण्यात आला. तेव्हा आमीर म्हणाला की, "मी आतापर्यंत सलमानला भेटलेलो नाही. तसंच सलमानने काय करावं, काय नाही, असा सल्ला द्यायला मी कोण आहे?" सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य ‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं होतं. ‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’ असं वादग्रस्तव वक्तव्य त्यानं केलं होतं. सलमानच्या ‘बलात्कार पीडित’ विधानावर सलीम खान यांचा माफीनामा वडील सलीम खान यांच्याकडून बचाव बलात्कार पीडितसंदर्भातील विधानावर वाद झाल्याने त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफी मागितली होती. ‘सलमानने त्याच्या कामाबाबत जे उदाहरण दिलं, ते चुकीचंच आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. पण त्याचा उद्देश चुकीचा नव्हता’, असं सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
सलमानचं महिला आयोगाला उत्तर, मात्र माफी नाही या वादग्रस्त वक्तव्याबाबत महिला आयोगाने सलमान खानला नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितलं होतं. सलमानने महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. मात्र ‘बलात्कार पीडित’ वक्तव्याबाबत माफी मागितली नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement