एक्स्प्लोर
Advertisement
रवी जाधवच्या 'न्यूड' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र
दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आले आहे.
मुंबई : दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आले आहे. कोणत्याही कटशिवाय सेन्सॉरने ‘अ’ प्रमाणपत्र देत या चित्रपटाला प्रमाणित केले आहे. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरु असलेला संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे.
इफ्फीच्या इंडियन पॅनारोमा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते. रवी जाधवच्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता.
मात्र, इफ्फीतून हा चित्रपट वगळण्यात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
‘न्यूड’... एक अनुभव!
'न्यूड'ची कथा माझ्या कथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा आरोप
इफ्फी फेस्टिव्हलमधून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ सिनेमा वगळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement