777 Charlie : '777 चार्ली'ने 25 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई; रक्षित करणार सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत
777 Charlie : '777 चार्ली' या सिनेमाने 25 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
777 Charlie : '777 चार्ली' (777 Charlie) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 20 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांत 80.48 कोटींची कमाई केली आहे.
'777 चार्ली' या सिनेमात रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) मुख्य भूमिकेत आहे. दाक्षिणात्य भाषांसोबत हा सिनेमा हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात एका व्यक्तीचे श्वानासोबत असणारे नाते दाखवण्यात आले आहे. रक्षित शेट्टीचा '777 चार्ली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
रक्षित शेट्टी सेवाभावी संस्थांना करणार आर्थिक मदत
'777 चार्ली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याने रक्षित शेट्टीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. हा सिनेमा सध्या 450 सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बजेटपेक्षा अधिक गल्ला जमवल्याने रक्षित शेट्टीने सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
रजनीकांतसह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या पसंतीस उतरला '777 चार्ली'
रक्षित शेट्टीचा '777 चार्ली' हा सिनेमा कलाकारांसह राजकारणी मंडळींनादेखील आवडत आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचेदेखील डोळे पाणावले होते. त्यांच्यासाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सुपरस्टार रजनीकांतलादेखील हा सिनेमा आवडला आहे.
'777 चार्ली' या सिनेमात रक्षित शेट्टीसह राज बी शेट्टी, बॉबी सिम्हा आणि दानिश सैत प्रमुख भूमिकेत आहेत. तर किरण राज के ने या सिनेमाचे कथानक लिहिले असून दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे.
संबंधित बातम्या