Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालकाला केवळ तीन दिवसांंचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण, कंत्राटी भरती करताना निकष डावलले का असा प्रश्न उपस्थित...
बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राट पद्धत...भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा आरोप...
मुंबईत कुर्ल्यामधल्या बस दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ७ वर, ड्रायव्हर संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी...
शंभर शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकरांची मारकडवाडीत टीका तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी...माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवर बोलताना जीभ घसरली...
इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचा ममता बॅनर्जींना पाठिंबा...तर हे त्यांंचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी फटकारलं...
बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, नागपूर, संभाजीनगरसह नाशिक, रत्नागिरीत मोर्चा
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला, ४८ वर्षांपासून सुरु असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत..