एक्स्प्लोर
आर्चीला आणखी दहा गुण मिळणार!
सोलापूर : ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्षभरात शैक्षणिक अडथळ्यांवर मात करुन आर्चीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती.
रिंकूला दहावीच्या परीक्षेत 66.40 % गुण मिळाले आहेत. मात्र आता तिला मिळालेल्या गुणांमध्ये आणखी 10 गुणांची वाढ होणार आहे.
राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे तिला हे वाढीव गुण मिळणार आहेत. आर्चीला सैराट सिनेमातील भूमिकेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता.
ज्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, त्याला विशेष गुण मिळतात. हे वाढीव 10 गुण रिंकू राजगुरुला मिळाले नव्हते. ते आता देण्याचं बोर्डाने मान्य केलं आहे.
दरम्यान, 'आर्ची'च्या गुणपत्रिकेत कला श्रेणीतील 5 गुण मिळाले होते. मात्र हे गुण चित्रकलेसाठी मिळाले होते.
व्यावसायिक सिनेमा कला श्रेणीत मोडत नसल्याचा बोर्डाचा निकष असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळेच रिंकूला हे गुण दिले नव्हते. पण अभिनयासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या बालकलाकाराला अतिरिक्त दहा गुण देण्याचा जीआर याच वर्षी जानेवारी 2017 मध्ये काढण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement