Bollywood Movies Of 2023 : बॉलीवूडच्या 'या' चार सिनेमांनी गाजवलं 2023 चे वर्ष, 'जवान'ची तगडी कमाई
Bollywood Movies Of 2023 : याशिवायही अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला उतरले आहेत. शारूखच्या जवान बंप्पर कमाई केली असून सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 2023 मध्ये कोण कोणत्या सिनेमांनी तगडी कमाई केली?
Bollywood Movies Of 2023 : चालू वर्षात अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये बॉलीवूड अभिनेता शारुख खान (Shah Rukh Khan) आणि सनी देओलच्या सिनेमांनी अख्ख वर्ष गाजवलंय. या दोघांच्या सिनेमांशिवाय अनेक अभिनेत्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. शारूखच्या जवानने बंप्पर कमाई केली असून सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) लाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. 2023 मध्ये कोण कोणत्या सिनेमांनी तगडी कमाई केली? जाणून घेऊयात....
शारुखचा 'जवान' अन् रणवीरच्या 'अॅनिमल'ची तुफान चर्चा (Jawan and Animal)
शारुखच्या जवान सोबतचं रणवीर कपूरच्या अॅनिमल या सिनेमालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. सनी देओलचा गदर 2 नेही वर्ल्डवाईड मोठी कमाई केली आहे. गदर 2 मध्ये अमिषा पटेल आणि सनी देओलने पहिल्या स्टोरीला पुढे नेले आहे. तर अॅनिमल हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडला आहे. बोल्ड सीन्स आणि अतोनात हिंसाचार अॅनिमलमध्ये दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शकाला सिनेमा बनवण्याचे स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रिया अनुराग कश्यपने अॅनिमलबाबतच्या वादावर दिली होती. कुमार अॅटलीने टॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर बॉलीवूडमध्येही हिट सिनेमाने एंट्री केली आहे.
सर्वांत जास्त कमाई कोणत्या सिनेमाने केली?
2023 मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत जवान टॉपला आहे. जवान चालू वर्षात सर्वात जास्त कमाई करणारा बॉलीवूड सिनेमा ठरला आहे. कुमार अॅटलीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने तब्बल 1150 कोटींची कमाई केलीय. तर शारुखच्या पठाणनेही पैसा वसूल केला आहे. पठाण या सिनेमाने 1045 कोटींची कमाई केली. तर वंगा रेड्डीच्या दिग्दर्शित अॅनिमलने वर्ल्डवाईट 885 कोटी कमावले आहेत. या शिवाय सनी देओलच्या गदर 2 ने 600 कोटींचा टप्पा पार केला. तर रजनीकांतच्या जेलरनेही 610 कोटींचा गल्ला जमवला.
प्रभासच्या सालार अन् शारुखच्या डंकीची जगभरात चर्चा
शारूखने या वर्षात अॅक्शन शिवाय कॉमेडी फिल्मही केली आहे. शारुखच्या डंकीने सध्या पैसा वसूल कमाई करण्यास सुरुवात केली आहे. डंकीने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर प्रभासच्या सालारने डंकीला मागे टाकले आहे. सालार 500 कोटींचा आकडा पार केला आहे. सालार सध्या तुफान कमाई करत आहे. 2023 मध्ये जवान, पठाण, सालार, गदर, डंकी यासारखे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या