एक्स्प्लोर

1993 मधील ब्लॉकबस्टर गाण्याचा वाद, जो वाद संसदेत पोहोचला, 'त्या' एका स्टेपमुळे घामटा फुटला!

Bollywood : 1993 मधील ब्लॉकबस्टर गाण्याचा वाद, जो वाद संसदेत पोहोचला, 'त्या' एका स्टेपमुळे घामटा फुटला!

Bollywood : बॉलिवूडमध्ये 1993 साली एक ब्लॉगबस्टर सिनेमा रिलीज झाला होता, या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडित काढले होते. या चित्रपटातील प्रेमचा ट्रायअँगल प्रेक्षकांना खूपच आवडला होता. विशेषतः या चित्रपटातील अभिनेत्रीसाठी हा चित्रपट एखाद्या वरदानासारखा ठरला. विशेष करून एक गाणं – ज्यावर प्रचंड वाद झाला, आणि ज्यामुळे चित्रपटाचं यश अधिकच वाढत गेलं.

त्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं नाव होतं ‘खलनायक’. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. शूटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणेच चित्रपट रिलीज केला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. 90 च्या दशकातील हा सर्वात गाजलेला चित्रपटांपैकी एक ठरला. पण जितकी चर्चा चित्रपटाची झाली, त्याहून अधिक गाजलं त्यातील एक गाणं.

1993 मध्ये आलेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही लोक विसरलेले नाहीत. गाणं जाहीर होताच संपूर्ण देशात प्रचंड गदारोळ झाला. या गाण्याचे बोल पारंपरिक विचारधारेला हादरवणारे होते. तब्बल 32 संस्थांनी या गाण्यावर आक्षेप घेतला होता, आणि काही ठिकाणी यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती. तरीही हे गाणं इतकं लोकप्रिय ठरलं की विक्रम नोंदवले गेले. हे गाणं अलका याग्निक आणि इला अरुण यांनी गायले होते, तर सरोज खान यांनी कोरिओग्राफी केली होती.

अलका यागनिकचा आवाज अन् माधुरी दीक्षित थिरकली 

या गाण्यात माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांनी एकत्र डान्स केला होता. दोघींच्या जोडीने स्टेजवर अक्षरशः आग लावली होती. गाणं इतकं गाजलं की एका आठवड्यात याचे 1 कोटीहून अधिक ऑडिओ कॅसेट्स विकले गेले – त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. माधुरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, गाण्यातील एक सीन शूट करत असताना तिला अक्षरशः घाम फुटला होता. त्या सीनमध्ये तिला कंबर  हलवायची होती, डोळ्यांनी एक्सप्रेशन द्यायचं होतं आणि चेहऱ्यावर भाव ठेवायचे होते – हे सगळं एकाच वेळी.

चित्रपटात संजय दत्तने ‘बल्लू बलराम’ ची भूमिका साकारली होती. संजय आणि माधुरी यांची जोडीही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले होते, तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीने दिलं होतं. नीना गुप्ता यांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रात या गाण्याचा उल्लेख केला आहे – त्यांनी सांगितलं की त्या काळात हे गाणं किती बोल्ड आणि हटके होतं आणि त्याचा भाग होणं त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो, अभिनेता तुषार घाडीगावकार याने आयुष्य संपवल्यानंतर सिनेसृष्टी हळहळली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Elections 2026: 'खान महापौर' करत सुटलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
'खान महापौर' करत सुटलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Elections 2026: 'खान महापौर' करत सुटलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
'खान महापौर' करत सुटलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Tanaji Sawant: शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Embed widget