तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो, अभिनेता तुषार घाडीगावकर याने आयुष्य संपवल्यानंतर सिनेसृष्टी हळहळली
Actor Tushar Ghadigaonkar Ended his life : तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो, अभिनेता घाडीगावकारने आयुष्य संपवल्यानंतर सिनेसृष्टी हळहळली

Actor Tushar Ghadigaonkar Ended his life : मराठी कलाक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी (दि.21) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. दरम्यान, कौटुंबिक वादातून त्याने आयुष्य संपवलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टी हळहळली असून त्याच्या जाण्याने कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील कलाकारांची प्रतिक्रिया
अभिनेता अंकुर वाढवे तुषारबाबत बोलताना म्हणाला, मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात ! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत Tushar Ghadigaonkar तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो.
वैभव मांगले काय काय म्हणाले?
या दुःखद घटनेवर अभिनेता वैभव मांगले यांनी भावना व्यक्त करत लिहिले आहे, "अनेकदा माणसं आतून पूर्णपणे तुटलेली असतात… आयुष्यातल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातलं वास्तव यामध्ये फार मोठं अंतर असतं… ही दरी दिवसेंदिवस वाढत जाते… लोक एकमेकांशी संवाद करत नाहीत… ऐकणारे कुणी उरत नाहीत… प्रश्नांची उत्तरं शोधायला कोणालाच वेळ नसतो… माणुसकीची ऊब कमी होत चालली आहे. कदाचित त्यामुळे अशी माणसं हळूहळू एकटी पडत जात असावीत का? सगळ्यांमध्ये असूनही."
तुषार घाडीगावकर हा मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा होता. त्याची विनोदी शैली प्रेक्षकांना आवडायची. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ आणि ‘सखा माझा पांडुरंग’ अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून त्यने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. याशिवाय त्यांने रंगमंचावर सुद्धा प्रभावी भूमिका साकारल्या. मालिकांमधील लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका, कॉमिक सेकेण्ड्स आणि भावप्रधान क्षणांनी त्यांने कला क्षेत्रात वेगळी छाप सोडली होती.
तुषार घाडीगावकरचं मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली होते. त्याने अभिनयाची सुरुवात रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना केली होती. महाविद्यालयाच्या नाट्य विभागातील तो धडाडीचा कलाकार होता. त्याच्या मित्रमंडळींमध्ये त्याला 'घाड्या' या टोपणनावाने ओळखले जायचे. इतक्या उत्साही आणि होतकरू कलाकाराने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याने मराठी अभिनय क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एक आठवड्यानंतर सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खानचं निधन























