(Source: ECI | ABP NEWS)
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला हायकोर्टाचा झटका, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा निर्णय
bollywood : 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.

bollywood : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. जॅकलीनने न्यायालयात याचिका दाखल करून ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून तिच्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे.
Delhi HC rejects Jacqueline Fernandez's plea against ED's chargesheet
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2025
Read @ANI Story | https://t.co/eCah5nSTF8#JacquelineFernandez #DelhiHC #SukeshChandrashekhar #ED pic.twitter.com/IOfRPYwOGy
जॅकलीन फर्नांडिसने आपल्या याचिकेत केवळ ईडीच्या एफआयआरला रद्द करण्याची मागणी केली नव्हती, तर खालच्या न्यायालयाने चार्जशीटवर घेतलेल्या आदेशालाही आव्हान दिलं होतं. जॅकलीन फर्नांडिसने याचिकेद्वारे न्यायालयाला विनंती केली होती की, त्यांच्या विरोधात सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया थांबवावी.
जॅकलीन फर्नांडिसने काय म्हटलं?
जॅकलीनचा दावा आहे की, त्यांना या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात आहे आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे व निराधार आहेत. जॅकलीनने हेही आरोप केले की, सुकेश चंद्रशेखर आणि अदिती सिंग यांनी मिळून तिची फसवणूक केली आहे. जॅकलीन म्हणाली की, ती कधीच सुकेशसोबत कोणत्याही नात्यात नव्हती. तिला एका कटाचा भाग बनवून टार्गेट करण्यात आलं आहे.
"माझा काहीही संबंध नाही"
अभिनेत्री म्हणाली की, त्यांचा मनी लॉन्ड्रिंगशी काहीही संबंध नाही आणि सुकेशने मुद्दाम त्यांना टार्गेट केलं आहे. जॅकलीनने म्हटलं की, सुकेशने केलेल्या त्या दाव्याला काहीही आधार नाही की दोघं रिलेशनशिपमध्ये होते. त्या म्हणाल्या की, हा दावा पूर्णपणे "खोटा" आणि "बिनबुडाचा" आहे.
प्रकरण काय आहे?
हे प्रकरण 2021 मध्ये समोर आलं, जेव्हा तिहार जेलमधूनच एका मोठ्या घोटाळ्याची आखणी करणाऱ्या ठग सुकेश चंद्रशेखर विरोधात मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण नोंदवण्यात आलं. आरोप आहे की, 200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुढील तपासात उघड झालं की, सुकेशने ही रक्कम अनेक सेलिब्रिटीजना महागडे गिफ्ट देण्यासाठी वापरली होती, ज्यामध्ये जॅकलीन फर्नांडिसचं नाव ठळकपणे समोर आलं. उपलब्ध माहितीनुसार, जॅकलीनला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपये होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
राशीचक्रकार शरद उपाध्ये म्हणाले, अहंकारी, गर्विष्ठ, अध:पतन, आता निलेश साबळेंचं उत्तर! VIDEO
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम का सोडला? निलेश साबळेंनी सांगितलं कारण; भाऊ कदम यांचाही तोच मुद्दा
























