एक्स्प्लोर

राशीचक्रकार शरद उपाध्ये म्हणाले, अहंकारी, गर्विष्ठ, अध:पतन, आता निलेश साबळेंचं उत्तर! VIDEO

Nilesh Sable reply Sharad Upadhye : राशीचक्रकार शरद उपाध्ये निलेश साबळे यांना अहंकारी, गर्विष्ठ म्हणाले होते. आता निलेश साबळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय चला हवा येऊ द्या, का सोडलं? यावरही निलेश साबळे यांनी भाष्य केलं.

Nilesh Sable reply Sharad Upadhye : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आता नव्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नव्या स्वरुपात येणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेते निलेश साबळे यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेंबद्दल अहंकार, गर्विष्ठ, अध:पतन असे शब्द वापरले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर निलेश साबळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

निलेश साबळे म्हणाले, सन्माननीय राशीचक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी मला थेट संवाद साधता आला असता. त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे. माझाही फोन नंबरही त्यांच्याकडे आहे. परंतू त्यांना काल सोशल मीडियावरुनच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे मी जरी सोशल मीडिया फार वापरत नसलो. तरी आज थोडा फार वापरण्याची वेळ आली. मला वाटायचं आपण सोशल मीडियावर नेहमी मनोरंजनाचे व्हिडीओ शेअर करावेत. आपलं काम लोकांना हसवणे आहे, तेवढचं आपण करुयात, असं वाटायचं. कधीतरी असा एक व्हिडीओ एम्फॉरमेटिव्ह किंवा जे खरं घडलंय, त्याचा व्हिडीओ करावा लागेल, असं मला वाटलं नव्हतं. पण ठीक आहे. वेळ असते आणि त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात. 

पुढे बोलताना निलेश साबळे म्हणाले, सन्माननीय शरद उपाध्ये सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळेस भेट झाली होती. कशी तीही मी प्रेक्षकांना सांगणार आहे. तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. गुरुतुल्य होतात आणि पुढेही राहाल. परंतु तुम्ही काल तुम्ही तुमच्या पोस्टची सुरुवात 'झी मराठीने निलेश साबळेंना डच्चू दिला', अशी झाली. निलेश साबळे यांना डच्चू दिला म्हणालात, तुम्हाला यातली काही माहिती आहे का?  डच्चू दिला हकालपट्टी केली? असं म्हणतात, त्यांना सर्वांना माहिती द्यायची आहे. त्या कार्यक्रमाला मी नाही म्हटलं आहे. तुम्हाला माहिती नसेल, त्यामुले म्हणतोय की, तुम्ही ही माहिती घ्यायला हवी होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

शरद उपाध्ये सर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आणि तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात. त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त होती. झी मध्ये तुमच्याही भरपूर ओळखी आहेत. तुम्ही एक फोन करुन विचारु शकला असतात की काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाही? तुम्ही झी मराठीमध्ये कोणाला तरी विचारायला हवं होतं. माहिती घ्यायला हवी होती. झी मराठीच्या हेड पदावर असणाऱ्या व्यक्तीने मला अनेक कॉल केले होते. मी नाव घेऊन बोलू शकतो. सन्माननीय रोहन राणे हे नॉन फिक्शन हेड होते. त्यांनी सहा महिन्यात अनेक वेळा कॉल केले होते. आपण चला हवा येऊ द्या सुरु करतोय.. डॉक्टर ते तुमच्याशिवाय होणार नाही. एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी आमची सविस्तर मीटिंग झाली. ही बैठक वरळीच्या ऑफिसला झाली. मी सध्या एक सिनेमा करतोय, त्यामध्ये मी अडकलो. माझ्या काही अडचणी होत्या. त्याच शूटींग आणखी दीड महिना सुरु राहणार आहे. त्यामुळे आणि तारखा न जुळल्यामुळे माघार घ्यायची मी रिक्वेस्ट केली.  याचा अर्थ असा नव्हता की, मला कार्यक्रम करायचा नव्हता. मी नकार दिला. मी स्वत:हून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय. मी स्वत; म्हणालोय, की मला सध्या आता तरी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाहीये. सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. भाऊ सध्या माझ्याबरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत. तेही या कार्यक्रमात नाहीयेत. दोन माणसं या कार्यक्रमात नाहीयेत. याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का?

उपाध्ये सर तुम्ही म्हणालात की, निलेश साबळेंच्या स्टेजवर माझा अपमान झाला आणि मीच तो केला असं तुमचं मत आहे. मला याबद्दल सांगायचं आहे की, 2014 ते 2015 च्या मध्ये हा एपिसोड शूट झाला. तेव्हा हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमांच्या पहिल्या 50 भागांमधला हा एक भाग आहे. 10 वर्ष झाली डोक्यात हवा गेली हे जे वाक्य आहे, त्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम होतोय. कारण 50 एपिसोडच झालेले आहेत. त्यामुळे पहिल्या काही भागांमध्येच माझ्या डोक्यात हवा गेली असेल, असा मिश्किल टोलाही निलेश साबळे यांनी लगावला.

शरद उपाध्ये सर म्हणाले, मला पाणी देखील विचारण्यात आलं नाही. तर याबद्दल मी सांगतो की, झी मराठीने हे सगळं पाहाण्यासाठी एक कंपनी नेमलेली आहे. ती कंपनी गेली अनेक वर्ष हा कारभार उत्तमपणे राबवते. कंपनीचे किती लोक काम करतात, हे कार्यक्रमाच्या शूटिंगला आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. चॅनेलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसिव्ह करण्यापासून मेकअप रुमपर्यंत नेण्याचं काम देखील करत असतात. क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं होतं. तेथील सर्वात मोठी रुम सरांनी देण्यात आली होती. मेकअप रुममध्ये पाण्याच्या बाटल्या असतात. त्याच्या आयोजनासाठी मीटिंग देखील झालेल्या असतात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

28 वर्षीय अडल्ट स्टार मृतावस्थेत सापडली, मृत्यूचं नेमकं कारण काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget