शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली मुंबई महापालिकेची टीम, CRZ चे नियम तोडल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
Shah Rukh Khan mannat investigatation : शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली मुंबई महापालिकेची टीम, CRZ चे नियम तोडल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan mannat investigatation : अभिनेता शाहरुख खान गेल्या चार महिन्यांपासून त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याचे नूतनीकरण करत आहे आणि सध्या तो आपल्या कुटुंबासह जवळच एका भाड्याच्या घरात राहत आहेत. या नूतनीकरणाच्या प्रक्रियेवरून त्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी मन्नतमध्ये जाऊन नूतनीकरणाची पाहणी केली आहे. हा बंगला मुंबईतील बांद्रा परिसरात समुद्रकिनाऱ्यावर आहे. बीएमसीकडे तक्रार आली होती की या नूतनीकरणात कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. (Shah Rukh Khan mannat investigatation)
या तक्रारीनंतर बीएमसीच्या एका टीमने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर भेट दिली आणि संपूर्ण कामाचा आढावा घेतला. सद्य:स्थितीत मन्नतचा नूतनीकरणाचा काम सुरु आहे आणि शाहरुख खान आपल्या कुटुंबासह जवळच राहात आहेत. CRZ कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, याची सध्या चौकशी सुरू आहे. (Shah Rukh Khan mannat investigatation)
View this post on Instagram
याच दरम्यान मन्नतच्या नूतनीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये काही वर्कर्स मन्नतच्या वरच्या मजल्यावर काम करताना दिसत होते. त्यांनी कामासाठी दोर व अन्य साहित्य बांधलेले दिसले. संपूर्ण घर सध्या रिकामे आहे आणि शाहरुख खान व त्यांचे कुटुंब मन्नतच्या बाहेर गेले आहेत.
‘मन्नत’चे नूतनीकरण होण्यास लागणार दोन वर्षांचा कालावधी
असं सांगितलं जात आहे की शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे नूतनीकरण पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सध्या शाहरुख, गौरी आणि त्यांची मुले बांद्रातील पॉश पाली हिल परिसरात असलेल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहाताना दिसून आले आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान यांनी हे अपार्टमेंट निर्माता वाशु भगनानी यांच्याकडून भाडेपट्टीवर घेतले आहे. वाशु भगनानी यांचे पुत्र आणि अभिनेता जॅकी भगनानी आणि दीप्ती देसाई हे या मालमत्तेचे मालक असून त्यांच्यासोबत शाहरुख यांनी डील केली आहे.
शाहरुख खानची आगामी फिल्म
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान मुख्य भूमिकेत असणार आहेत. अभय वर्माही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























