'दीप- वीर'च्या New Year सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावरुन एकाएकी सर्वच पोस्ट डिलीट करणाऱ्या दीपिकानं आता या नव्या वर्षाचं म्हणजेच 2021 चं स्वागत नेमकं कसं केलं, याची एक झलक सर्वांच्याच भेटीला आणली आहे.
!['दीप- वीर'च्या New Year सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ व्हायरल Bollywood actress deepika padukone ranveer singh ranthambore national park pics and video 'दीप- वीर'च्या New Year सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04175536/deepikaran.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (deepika padukone) दीपिका पदुकोण हिनं हल्लीच पती रणवीर सिंह याच्यासोबत रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या सफरीवर जात नववर्षाचं स्वागत केलं. सोशल मीडियावरुन एकाएकी सर्वच पोस्ट डिलीट करणाऱ्या दीपिकानं आता या नव्या वर्षाचं म्हणजेच 2021 चं स्वागत नेमकं कसं केलं, याची एक झलक सर्वांच्याच भेटीला आणली आहे.
जंगल सफारीवर गेलं असता तिथं नेमका काय अनुभव आला याचीच सुरेख कहाणी तिनं अतिशय आकर्षक स्वरुपात शेअर केली आहे. पाहा, माझं न्यू इयर सेलिब्रेशन काहीसं असं होतं.... असं कॅप्शन तिनं या पोस्टला लिहिलं. सोबत राजस्थान आणि रणथंबोर असे हॅशटॅगही तिनं जोडले. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये दीपिकाता सफारी लूक लक्ष वेधून जात आहे. जिथं ती प्लॅड कोटमध्ये दिसत होती. सूर्यकिरणांच्या दिशेनं चालणारी दीपिका नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
दीपिकाच्या या पोस्टला सोशल मीडियावर अनेक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी इथंच तिला नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट एकदा पाहाच....
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
एक अल्पविराम हवाच....
2020 हे वर्ष सर्वांसाठी विचित्र आणि उलथापालथीचं होतं. पण, माझ्यासाठी हे इतरांप्रती आभारी असण्याचंही वर्ष होतं. 2021 साठी मी सर्वांसाठीच चांगलं आरोग्य आणि मनशांतीची कामना करते. असं तिनं एका ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
दीपिका तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लिहिते, 'बहुधा त्या लोकांना ही बाब ठाऊक नसावी, की यामध्ये त्यांची किती मोठी भूमिका आहे. माझ्यासाठी कुटुंब, मित्रांसमवेत कोणत्याही व्यत्ययाशिवाय वेळ व्यतीत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे मला एका अदृश्य गोष्टीशी आपण जोडले गेलो असल्याची जाणीवर करुन देत राहतं. मी कुठून आले आहे याचीच अनुभूती करुन देतं. बरं याचीही जाणीव करुन देतं की मी आज जिथवर पोहोचली आहे, तिथे पोहोचण्यासाठी मला त्यांचीच मदत झाली आहे. त्यामुळं एक अल्पविराम नक्की घ्या.'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)