एक्स्प्लोर

TV Naagin 7 Patriotic Scene: 'हेच बघायचं बाकी होतं...', एकता कपूरच्या शोमध्ये 'देशभक्त नागिण', इस्रोच्या रॉकेटला ठोकला सलाम; नेटकरीही हैराण

TV Naagin 7 Patriotic Scene: एकता कपूरच्या 'नागीण 7' या मालिकेत सध्या अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एका भागातील दृश्य पाहिल्यानंतर, प्रेक्षकांनी या अलौकिक मालिकेची खिल्ली उडवली आहे.

TV Naagin 7 Patriotic Scene: प्रियांका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) स्टारर टेलिव्हिजनवरचा सर्वाधिक चर्चेत असणारी मालिका, 'नागीन' (Naagin) चा सातवा सीझन, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. आता सध्या ही मालिका प्रियांकाच्या लूकमुळे चर्चेत आली होती. एकता कपूरच्या या सीरिअलमधील एक सीन व्हायरल होत आहे. या सीनमुळे सोशल मीडिया युजर्सना हसून हसून पोटात दुखू लागलं आहे. अनेकांना तर तो सीन पाहून काय बोलावं, हेच सुचेनासं झालंय. काहीजण तर हा सीन पाहिल्यापासून नुसते हसतच सुटले आहेत. 

'नागीन 7'मधील 'हा' ड्रामॅटिक सीन व्हायरल 

एकता कपूरनं 'नागीन' सीरिअलच्या सातव्या सीझनमध्ये लव्ह स्टोरीसोबतच 'देशभक्ती'चाही सीन प्रेक्षकांसाठी दाखवला आहे. मालिकेतल्या 'नागीन' कशा 'चंगिस्तान'मधून कशा आपल्या देशाचं रक्षण करतात, हे शोमध्ये दाखवण्यात आलं आहे. गेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलंय की, आहना (Priyanka Chahar Choudhary) आणि भरणी (Alice Kaushik) दोघी एकत्र येऊन एका ड्रॅगनचा सामना करतात आणि देशासाठी झटणाऱ्या वैज्ञानिकांचा जीव वाचवतात. 

एपिसोडमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, नागिनींनी जीव वाचवल्यानंतर आपल्या सीक्रेट चेंबरमध्ये जाऊन वैज्ञानिक यशस्वीरित्या एक रॉकेट लॉन्च करतात. जेव्हा दोन्ही नागिण रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात झेपावताना दिसतात, तर त्या त्या रॉकेटकडून पाहून सॅल्यूट करतात आणि बँकग्राउंडमध्ये 'वंदे मातरम' गाण वाजू लागतं. एकता कपूरनं या मालिकेत पौराणिक कथा, देशभक्ती आणि नाट्यमय दृश्यांचा जो सुरेख मेळ साधला आहे, त्यानं सोशल मीडिया युजर्सचं लक्ष तत्काळ वेधून घेतलं आहे.

युजर्सनी प्रियांका चहरच्या मालिकेची उडवली खिल्ली 

'नागीन 7'मध्ये दाखवण्यात आलेला हा विचित्र प्रसंग पाहिल्यानंतर, सोशल मीडियावरील युजर्सना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. युजर्सनी तर एकता कपूर आणि प्रियांका चहरला चांगलंच फैलावर घेतलं आहे. 

TV Naagin 7 Patriotic Scene: 'हेच बघायचं बाकी होतं...', एकता कपूरच्या शोमध्ये 'देशभक्त नागिण', इस्रोच्या रॉकेटला ठोकला सलाम; नेटकरीही हैराण

एका युजरनं लिहिलंय की, "माझ्या संपूर्ण कुटुंबात 'देशभक्त नागीन' पाहणारी पहिलीच व्यक्ती मी ठरलोय. भारतीय टीव्ही मालिका खरोखरंच आता सर्वोच्च शिखरावर पोहोचल्या आहेत!"

TV Naagin 7 Patriotic Scene: 'हेच बघायचं बाकी होतं...', एकता कपूरच्या शोमध्ये 'देशभक्त नागिण', इस्रोच्या रॉकेटला ठोकला सलाम; नेटकरीही हैराण

आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मी ही मालिका परवाच पाहिली. खरं सांगायचं तर, हा सीन पाहून मला हसूच आवरता आलेलं नाही..." 

TV Naagin 7 Patriotic Scene: 'हेच बघायचं बाकी होतं...', एकता कपूरच्या शोमध्ये 'देशभक्त नागिण', इस्रोच्या रॉकेटला ठोकला सलाम; नेटकरीही हैराण

आणखी एका युजरनं म्हटलंय की, "भारतीय टीव्ही मालिकांनी आता एक पूर्णपणे नवीन पातळी गाठली आहे..." दरम्यान, हॉलिवूडशी तुलना करत एका युजरनी लिहिलंय की, "मार्वेलची कोणाला गरज आहे? आपल्याकडे तर आपल्या राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या देशभक्त नागिणी आहेत." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji First Look Teaser: शौर्य, सन्मान अन् स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक; 'धुरंधर द रिव्हेंज'सोबत 'राजा शिवाजी'चा First Look Teaser थिएटरमध्ये रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget