3 वर्षात 2 चित्रपट आले, फ्लॉप ॲक्टरचा शिक्का, 4700 कोटींचा मालक असलेला 'हा' अभिनेता आहे तरी कोण?
या अभिनेत्याला अभिनय क्षेत्रात फार काही करता आलं नाही. पण तो आज 2700 कोटींचं साम्राज्य सांभाळतोय. सिनेसृष्टीत आज त्याचं वेगळं नाव आहे.
मुंबई : सिनेसृष्टीत रोज नवनवे चेहरे येतात. मोठं नाव कमवण्याची आशा बाळगून ते बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावतात. पण या क्षेत्रात प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. काही चेहऱ्यांना कमी काळात प्रसिद्धी मिळते. तर काही चेहऱ्यांना मात्र सिनेरसिक नाकारतात. सिनेसृष्टीत फार काही करता आलं नाही, म्हणून आपली दुसरी वाट निवडणारे अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्या तुम्हाला पाहायला मिळतील. याच पार्श्वभूमीवर चित्रपटात हिरो होण्याची इच्छा बाळगणाऱ्या अशाच एका प्रोड्यूसरच्या मुलाबाबत आपण जाणून घेऊ या. या हिरोला अभिनेता म्हणून फार काही नाव कमवता आलं नाही. मात्र आज तो 4700 कोटींच साम्राज्य चालवतोय.
आज सांभाळतोय 4700 कोटींचं साम्राज्य
या अभिनेत्याचं नाव आहे गिरीश कुमार तौरानी. या अभिनेत्याने तीन वर्षांत दोन चित्रपट केले होते. मात्र हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यानंतर मोठ्या पडद्यावर नाव कमवता न आल्याने या हिरोने चित्रपट निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला. आज हाच गिरीश कुमार आज आपल्या वडिलांचे कोट्यवधीचे साम्राज्य सांभाळतोय. गिरीश कुमारने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून तीन वर्षे काम केलं होतं. मात्र त्याचा एकही चित्रपट हिट ठरू शकला नाही.
चित्रपटात अभिनेता म्हणून केलं काम
गिरीश कुमारच्या वडिलांचे नाव रमेश तौरानी असे आहे. तौरानी हे एक दिग्गज चित्रपट निर्माते आहेत. टिप्स इंडस्ट्री ही कंपनी त्यांच्याच मालकीची आहे.रमेश तौरानी यांनी सैफ अली खान, बॉबी देओल, रणबीर कपूर, कॅटरीने कैफ, अजय देवगन आदी दिग्गजांच्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. गिरीश कुमारचा 2013 साली रमैया वस्तावैया हा पहिला चित्रपट आला होता. मात्र त्याचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर 2016 साली गिरीशचा लव्हशुदा हा चित्रपट आला. पण या चित्रपटातही त्याला फारसे चांगेल काम करता आले नाही. त्याचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला. त्यानंतर गिरीशने अभिनेता म्हणून काम करणे सोडून दिले.
2016 साली गुपचूप लग्न केलं
दरम्यान, आता अभिनय सोडल्यानंतर आथा गिरीश आपले वडील आणि काका यांची चित्रपट निर्मिती करणारी कंपनी सांभाळतोय. गिरीश या कंपनीत चिफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे. चित्रपटाची निर्मिती करणे, चित्रपटाचे वितरण, चित्रपटासाठी संगीतनिर्मिती अशी वेगवेगळी कामे तो सांभाळतो. टिप्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजारमूल्य आज 4700 कोटी रुपये आहे. आज तो ही कंपनी सांभाळतोय. 2016 साली गिरीशने त्याची लहाणपनीची मैत्रीण आणि गर्लफ्रेंड कृष्णा मंगवानी हिचाशी गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर एका वर्षांनी त्याने लग्न केल्याचं सार्वजनिक केलं होतं.
हेही वाचा :
'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवे फोटो!