सना मकबूल ठरली बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची विजेती, ट्रॉफिसह मिळाले तब्बल 25 लाख रुपये!
Bigg Boss OTT3 Finale Announced : अखेर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. या पर्वाचे सहा आठवडे चांगलेच मनोरंजक ठरले.

Bigg Boss OTT finale Winner : गेल्या सहा आठवड्यांपासून चालू असलेले Bigg Boss OTT चे तिसरे पार्व फारच उत्कंठावर्धक राहिले. या तिसऱ्या पर्वात कोण विजयी ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. या पर्वाची सना मकबूल 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
चार तगड्या स्पर्धकांना टाकलं मागं
अभिनेत्री सना मकबूलने अखेर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. तिच्यासोबत अंतीम फेरीत नेझी, साई केतन राव, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे चार विजेतेच्या शर्यतीत होते. पण या चारही स्पर्धकांना मागे टाकत सना मकबूलने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीसह सनाला तब्बल 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
Can’t get over the winning moment of @SANAKHAN_93 🏆🎉@AnilKapoor #BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBossOTT3 #BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/PzFJZpT373
— JioCinema (@JioCinema) August 2, 2024
यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी अनिल कपूर
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा 2 ऑगस्ट रोजी पार पाडला. हा महाअंतिम सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. महाअंतिम सोहळ्यात एकूण पाच स्पर्धक शर्यतीत होते. पण या पाचही स्पर्धकांवर सना मकबूलने मात केली. बीग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन यावेळी अभिनेता अनिल कपूरने केले. बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण ठरलेले आहे. मात्र यावेळच्या बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची धुरा अनिल कपूर यांनी सांभाळली. विशेष म्हणजे त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली.
यावेळी बिग बॉस ओटीटीच्या घरात कोण कोण होतं?
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात 21 जून रोजी झाली होती. स्ट्रिमिंग अॅप जिओ सिनेमावर हे तिसरे पर्व दाखवण्यात आले. यावेळच्या पर्वात शिवानी कुमारी, सना मकबूल, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, मुनीषा खटवानी, विशाल पांडे, लवकेश कटारिया, दीपक चौरसिया, सना सुल्तान, नीरत गोयत, पौलमी दास, पायल मलिक, अरमान मलिका, कृतिका मलिक, साई केतन राव, नेजी, रणवीर शौरी हे स्पर्धक सामील झाले होते. शेवटी महाअंतिम सोहळ्यात एकूण पाच स्पर्धकांपैकी कृतिका मलिक सर्वांत अगोदर घराबाहेर गेली. त्यानंतर साई केतन राव हादेखील स्पर्धेतून बाद झाला. रणीवीर शौरी टॉप तीन खेळाडूंमध्ये होता. पण त्यालाही शेवटी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
