Aishwarya Rai : ऐश्वर्या राय भारतात परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट व्हायरल, 'डीप इमोशन'बद्दल म्हणाले...
Amitabh Bachchan Twitter Post : सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या भारतात परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट पोस्ट केली असून ती चर्चेत आली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि बच्चन कुटुंब (Bachchan Family) सध्या चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात कोल्ड वॉर सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, हे लोक आपल्यामध्ये सर्व काही ठीक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. याशिवाय ऐश्वर्या आणि तिची मुलगी बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याचंही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
ऐश्वर्या राय भारतात परतल्यानंतर बिग बींची पोस्ट व्हायरल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब मीडियासमोर एकत्र पोज देताना दिसलं नाही, यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत न्यूयॉर्कला फिरण्यासाठी गेली होती. ऐश्वर्या मुलीसह न्यूयॉर्कहून मध्यरात्री परतली, पण यावेळीही ती घरी जाताना एकटीच दिसली. यामुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांची नवीन सोशल मीडिया पोस्ट
ऐश्वर्या राय न्यूयॉर्कहून 15 दिवसांनंतर परतली आणि त्यानंतर आता बिग बींनी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ते 'डीप इमोशन'बद्दल बोलत आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात सुरु असलेल्या मतभेदांच्या अफवांदरम्यान बिग बी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या भारतात परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट पोस्ट केली असून ती चर्चेत आली आहे.
'डीप इमोशन'बद्दल अमिताभ बच्चन म्हणाले...
मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या सोळाव्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर सेटवर काम करण्याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, "केबीसीमध्ये काम... यासाठी बरेच तास लागतात, पण स्पर्धकांसोबतचा माझ्या संवाद मला गूढ भावना आणि रोमांचक अनुभव देतो."
बच्चन कुटुंबातील मतभेद चर्चे असताना बिग बी यांनी गूढ पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 13 जुलै रोजी त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये हरवलेलं आणि विसरलेलं काय आहे, याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :