Bigg Boss Marathi : घरात येणार दोन नवे पाहुणे, पाहुणचार करता करता घरातल्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार 'हे' बेबी
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता दोन नवे पाहुणे येणार असून त्यांचा पाहुणचार करता करता या घरातल्यांच्या डोळ्यातून मात्र पाणी निघणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi new season) घरात दोन बाहुले आले आहेत. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. घरात बाळ येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बाळांना सांभाळण्याचा आदेश 'बिग बॉस'ने दिला आहे. प्रोमोमध्ये निक्की-अरबाज, अंकिता, वर्षा ताई हे सदस्य बाळाचा सांभाळ करताना दिसत आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"घरात बेबी येण्याच्या आनंदात दोन्ही टीमने आपापल्या बेबींना सांभाळायचं आहे". दरम्यान कुशीत बेबी असलेली निक्की सूरजकडे पाहून म्हणते,"बुक्कीत टेंगूळ आपण आईला देऊयात". तर दुसरीकडे वर्षा ताई बेबीला सांगतात,"निक्की नावाच्या बाईने हैदोस माजवला आहे". त्यानंतर 'बिग बॉस' बेबीचं लंगोट बदलण्याची वेळ झाली असल्याचं सांगतात. आता या लंगोट बदलण्यावरुन घरात काय धमाका होणार हे पाहावे लागेल.
निक्की-आर्यामध्ये रंगलाय वाद
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात आर्या निक्कीला म्हणतेय,"इथे सगळेच गेम खेळायला आले आहेत". त्यावर निक्की आर्याला म्हणते,"तू गेम खेळतेस की नाही हे मला माहिती नाही". त्यावर आर्या म्हणते,"मला गेम खेळायची गरज नाही...मला तुझा प्रॉब्लेम आहे". निक्कीला उत्तर देत आर्या म्हणते,"तुला माझा प्रॉब्लेम आहे तर वीकेंडला वगैरे कोणती लिपस्टिक लावू, कोणता झुमका घालू, असं विचारत माझ्याकडे यायचं नाही".
View this post on Instagram
'बिग बॉस'ने घेतली निक्कीची फिरकी...
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. 'बिग बॉस'यांनी म्हटले की, "बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत". त्यानंतर घरात दोन बाहुल्यांची एन्ट्री झालेली दिसून येते. बाहुल्यांना पाहून घरातील सर्व सदस्य आनंदीत होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. एका बाहुल्याला निक्की घेते, तर एका बाहुल्याला जान्हवी घेते. त्यानंतर निक्की पुढे घन:श्यामला विचारते,"तू मामा आहेस ना". घन:श्यामही निक्कीला उत्तर देत "हो..मी मामा आहे", असं म्हणतो. त्यावर निक्की पुढे म्हणते,"बाळ माझ्यासारखं आहे". त्यानंतर निक्कीला 'बिग बॉस' म्हणतात,"निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS". त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
