मांडव सजला! बिगबॉसफेम अभिनेत्याला हळद लागली; कार्यक्रमात तृप्ती देसाईचा भन्नाट डान्स; पहा व्हिडिओ
जय आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला हळद लावून नंतर हळदी समारंभात तृप्ती देसाईंनी भन्नाट डान्स केला.

Jay Dudhane Haldi Ceremony: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) सध्या चर्चेत आहे त्याच्या लग्नाच्या विधींमुळे. बिग बॉसच्या घरात गाजलेला जय लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच त्याचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या केळवणाचीही चर्चा रंगली होती. जयच्या घरी सध्या लग्नाचं वारं वाहतंय. त्याचे लग्नापूर्वीचे विधी सध्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. नुकताच जयचा हळद समारंभ पार पडला.
या समारंभाला बिग बॉस मराठी मधील कलाकारांनी ही हजेरी लावली होती. यात तृप्ती देसाई देखील जयच्या हळदीला आवर्जून उपस्थित राहिल्या. जय आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला हळद लावून नंतर हळदी समारंभात तृप्ती देसाईंनी भन्नाट डान्स केला. आज ठाण्यात बिगबॉस मधील आमचा सहकारी , लाडका जय दुधाने याच्या हळदीला डान्स , धमाल आणि आमच्या लाडक्या दादूसचा ऑर्केस्ट्रा असं लिहित या कार्यक्रमातील धमाल त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेला जय त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि सोशल मीडियां सर हर्षला पाटील याच्यासोबत लग्न करत आहे. बिग बॉस मराठी 3 नंतर जयच्या फॅन फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली. जयने उत्तराखंडमधील मसूरीच्या सुंदर डोंगरदऱ्यात रोमँटिक अंदाज हर्षलाला प्रपोज केलं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांना विशेष आवडत आहे.
साखरपुड्यानंतर लगीनघाई सुरू
अभिनेता जय दुधाने लवकरच बोहल्यावर चढणार असून नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे. आणि त्याच्या घरी लगीनघाई सुरूय. नुकताच त्याचा हळद समारंभही पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खास सोहळ्याचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.लग्नाची तारीख अभिनेत्याने रिव्हिल केली नसली तरी जय बोहल्यावर कधी चढणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
कोण आहे बिग बॉस स्टारची होणारी पत्नी ?
जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि व्हिडिओ इन्फ्लुएंसर आहे. instagram वर त्याचे लाखो फॉलोवर्स असून ती फॅशन आणि ट्रॅव्हलशी संबंधित व्हिडिओ बनवते. गेल्या काही वर्षांपासून की जयला डेट करत आहे.























