Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात रंगणार 'फॅमिली विक'; घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे.
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 4) खेळ अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. बिग बॉस मराठी सीझन 4 च्या फिनालेला अवघे तीन आठवडे बाकी आहेत. बिग बॉसच्या घरात फॅमिली विक सुरु आहे. घरातील सदस्यांचे कुटुंबीय या निमित्ताने भेट घेण्यासाठी येतात. एकंदरीतच भावूक करणारा हा फॅमिली वीक असतो.
आज होणाऱ्या फॅमिली विकमध्ये घरातील सदस्य आरोह वेलणकरच्या घरातून त्याची आई पत्नी आणि मुलगा असे तिघेजण येतात. आपल्या मुलाला पाहून आरोह नि:शब्द होतो. तसेच, अनेक गंमतीजमती देखील बघायला मिळणार आहेत. तर, अक्षय केळकरच्या घरातून त्याची आई आणि बहीण येते. आपल्या फॅमिलीला बऱ्याच दिवसांनी भेटून घरातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
View this post on Instagram
इतक्या दिवसांपासून घरापासून आणि जवळच्या माणसांपासून दूर राहणाऱ्या सदस्यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आले आहेत. बिग बॉसच्या टास्कमधील 'फॅमिली विक' हा टास्क घरातील सदस्यांना तसेच प्रेक्षकांना अतिशय भावूक करणारा हा टास्क आहे. सदस्यांबरोबरच प्रेक्षकही या टास्कची आतुरतेने वाट पाहत असतात.
हे सदस्य आहेत नॉमिनेट :
बिग बॉसच्या घरात आता अवघे सात सदस्य बाकी राहिले आहेत. यामध्ये आरोह वेलणकर आणि राखी सावंत हे वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आले आहेत. तर, अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि किरण माने हे सदस्य फिनालेच्या स्पर्धेसाठी तयार आहेत. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी आरोह वेलणकर आणि प्रसाद जवादे हे दोन सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यापैकी कोणता सदस्य फायनलसाठी पुढे जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Subodh Bhave: 'हातात अगरबत्ती आणि वेफर' सुबोध भावे नक्की करतोय काय? पोस्टनं वेधलं लक्ष