Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास
Big Boss 16 : बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दिसून येते की, अर्चनाबरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे.

Big Boss 16 : जेव्हापासून अर्चना गौतमला (Archana Gautam) बिग बॉस 16 (Big Boss 16) च्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे, तेव्हापासून ट्विटरवर फक्त दोनच नावे चर्चेत आहेत. ती म्हणजे अर्चना गौतम आणि शीव ठाकरे (Shiv Thakare). शिवच्या मास्टर प्लॅनमध्ये अर्चना गौतमने स्वत:वरचा ताबा तर सोडलाच. पण, त्याचबरोबर बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केले. शिवच्या मानेवर हात ठेवून अर्चनाने बिग बॉसच्या घरचे दरवाजे स्वत:साठी कायमचे बंद केले.
अर्चना आपल्या पक्षाशी तसेच पक्षातील सदस्यांशी किती संलग्न आहे हे शिवला चांगलेच माहीत होते. आणि याच कारणास्तव शिवच्या चालीपुढे अर्चनाने स्वत:वरचा ताबा सोडला. आणि अर्चना घराबाहेर पडली. मात्र, बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दाखविण्यात आले आहे की, अर्चना बरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे. त्याबरोबरच शिवची सुद्धा शाळा घेणार आहे.
नुकताच कलर्स टीव्हीने सोश मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शिवचा मास्टर प्लॅन सगळ्यांसमोर उघड केला जाणार आहे. यावरून सलमान शिवची शाळा घेणार आहे असे दिसते. तर, दाखविण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सलमानची शिववर नाराजी स्पष्टपणे दिसते आहे.
View this post on Instagram
अर्चना गौतमने वारंवार विनंती करूनही शिवने तिला बेघर करण्याचा निर्णय घेतला. अर्चना गौतम सारखी शिवकडे शेवटची संधी मागत राहिली, पण शिवने तिचे ऐकले नाही. जर तुम्ही शेवटचा एपिसोड पाहिला असेल तर अर्चना गौतमच्या डोळ्यांत या चुकीचा पश्चात्ताप दिसून येतोय. गेल्या दोन दिवसांपासून अर्चनाला परत आणण्याचा ट्रेंड सुरू आहे. बिग बॉसच्या मागील 2 सीझनचे विजेते देखील अर्चना गौतमला सपोर्ट करताना दिसत आहेत. शिल्पा शिंदे आणि गौहर खान यांनी अर्चनावर अनेक प्रतिक्रिया दिल्या.
महत्वाच्या बातम्या :
Big Boss 16 : अर्चना गौतमने साजिद खानवर केला 'हा' आरोप; बिग बॉसनेही सुनावले खडे बोल























