Bigg Boss Marathi: 'या घरात वाजला गोलीगत पॅटर्न', बिगबॉसच्या कौतुकानं सुरजच्या डोळ्यात पाणी, 'सिंपथी कार्ड' वापरू नका', नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
बेक्कार, बुक्कीत टेंगूळ असं म्हणत बिग बॉसच्या घरात आलेल्या सुरजनं अल्पावधीतच लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
![Bigg Boss Marathi: 'या घरात वाजला गोलीगत पॅटर्न', बिगबॉसच्या कौतुकानं सुरजच्या डोळ्यात पाणी, 'सिंपथी कार्ड' वापरू नका', नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.. Big Boss Marathi season 5 Bigg Boss Praise Brings Tears in Suraj Eyes Netizens comments do not play sympathy card Bigg Boss Marathi: 'या घरात वाजला गोलीगत पॅटर्न', बिगबॉसच्या कौतुकानं सुरजच्या डोळ्यात पाणी, 'सिंपथी कार्ड' वापरू नका', नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/02/320386158157329a2b2a9db4052cfee817278515151061063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Big Boss Marathi: सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनची (bigg boss marathi season 5) प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असून हा सिझन आता अंतीम टप्प्यात आला आहे. दरवर्षी ग्रँड फिनालेच्या आधी स्पर्धकांचा प्रवास दाखवणारे सेलिब्रेशन करण्यात येत असून बिगबॉसनं यात ट्विस्ट आणला आहे. पहिल्यांदाच बिगबॉसचे स्पर्धक या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणार आहेत. यात सुरजच्या प्रवासाविषयी बिग बॉसने कौतुक केल्याचे दिसणारा. एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया उमटल्यात.
सोशल मीडियावर झापुक झूपूक, बुक्कीत टेंगूळ आणि गुलीगत पॅटर्नसाठी सुरजला अनेकांनी डोक्यावर घेतले. बिग बॉस फिनालेपूर्वीच्या या सेलिब्रेशनमध्ये सूरजची गुलीगत एन्ट्री होणार दमदार असं लिहीत कलर्स मराठीनं हा प्रोमो शेअर केला आहे.
बिगबॉसच्या कौतूकानं सूरजचे डोळे पाणावले
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेपूर्वी होणाऱ्या आजच्या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये दाखवण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये बिग बॉसनं तुम्ही आमचेच नाही तर सबंध महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचं सांगत सूरजचे कौतूक केले. या घरात अनेक पॅटर्न पहायला मिळाले पण या घरात गाजला गुलीगत पॅटर्न. असं म्हणत सूरजचे स्वागत केले. बिगबॉसच्या कौतुकानं सूरजचे डोळेही पाणावले होते. बेक्कार, बुक्कीत टेंगूळ असं म्हणत बिग बॉसच्या घरात आलेल्या सूरजनं अल्पावधीतच लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वत:चा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आलेला सूरज त्याला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून प्रचंड भावुक झाला होता.
कलर्स मराठीनं शेअर केला प्रोमो
कलर्स मराठीनं बिग बॉसच्या ग्रँड सेलिब्रेशनचा प्रोमो शेअर केला आहे. यात Grand finale च्या आधी पहिल्यांदाच होणार Grand celebration जोरदार, सूरजची गोलीगत एन्ट्री होणार दमदार असं लिहलंय.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या असून काहींनी सूरजचं कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवलाय, तर काहींनी सिंपथी कार्ड वापरू नका असंही सुनावलंय. सूरज बिगबॉसचा विनर होणार अशा आशयाच्याही प्रतिक्रीया आहेत. काहींनी फक्त सिंपथी देऊन जिंकवणार असाल तर बाकी स्पर्धकांवर अन्याय असल्याचं म्हटलंय. सूरजमुळेच बिग बॉस शो पहात असल्याचं अनेकांनी लिहिलंय.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)