(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले 'विष-अमृत नॉमिनेशन कार्य'; 'हे' स्पर्धक झाले नॉमिनेट
Big Boss Marathi 4 : बिग बॉसने सदस्यांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपवले. या कार्यात काही आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत.
Big Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील मराठी बिग बॉस सीझन 4 (Big Boss Marathi 4) अत्यंत रंजक अशा वळणावर आला आहे. बिग बॉसने सदस्यांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य (Nomination Task) सोपवले आहे. या कार्यादरम्यान प्रत्येक जो सदस्य पेटारा उघडून त्यातील हिरव्या रंगाचे विष मिळवेल त्या सदस्याला इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी मिळेल. तसेच, ज्या सदस्याच्या हाती पांढरा रंग येईल त्याला सदस्यांना नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित करता येईल. यानुसार, काल झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत प्रसाद जवादेने अमृता देशमुखला नॉमिनेट केले. तर, नुकतीच वाईल्ड कार्ड (Wild Card Entry) म्हणून एन्ट्री घेतलेल्या स्नेहलताने अपूर्वा आणि अमृता धोंगडे यापैकी अमृताला नॉमिनेट केले.
बिग बॉसमध्ये झालेल्या विष-अमृत या नॉमिनेशन प्रक्रियेत अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण आणि समृध्दी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.
नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट झालेली अमृता धोंगडे मात्र तेजस्विनीवर तसेच इतर सदस्यांवर नाराज झाली आहे. अमृताचे म्हणणे आहे, मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पोसिटीव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाल नाही करत याची काय गरज आहे तेजा? असं ती तेजस्विनीला म्हणते. तर, यावर तेजस्विनीचे म्हणणे आहे की, "कुठे सपोर्ट करतो आहे तिच्या निकषांवर ती पॉइंट 5 ने उजवी पडली".
तर, दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे, "मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत. ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल. ते मला जे म्हणतात ना मी नाही घाबरत वैगरे ... घाबरणं किंवा नाही घाबरणं हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले". तर यावर अमृता देशमुख म्हणाली, "तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा." यावर स्नेहलताचे म्हणणे आहे, निकष चुकला नव्हता ना? फक्त मी मांडताना वाक्यरचना चुकली आहे. आता आजच्या भागात नेमके काय होणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या :