एक्स्प्लोर

Bhay The Gaurav Tiwari Mystery Series Review: सत्य घटना पण, रहस्यमयी मृत्यू; 8.8 IMDb रेटिंग, 'ही' हिंदी हॉरर थ्रीलर सीरिज पाहून थरथर कापाल

Bhay The Gaurav Tiwari Mystery Series Review: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय.

Bhay The Gaurav Tiwari Mystery Series Review: सध्या ओटीटीमुळे (OTT) मनोरंजन प्रत्येकाच्या हातात आलंय. आपण कधीही, कुठेही आणि केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा अगदी सहज सिनेमे (Movies), वेब सीरिज (Web Series) पाहू शकतो. सध्या ओटीटीची (OTT Released) चलती असल्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या (Amazon Prime Video) एमएक्स प्लेअरवर (MX Player) प्रदर्शित झालेली 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' (Bhay: The Gaurav Tiwari Mystery) ही वेब सीरिज (Web Series) सध्या प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या गूढ मृत्यूवर आधारित आहे.  

एका प्रसिद्ध घटनेवर आधारित ही कथा केवळ घाबरवणारी नाही तर प्रत्येक वळणावर विचार करायला लावते. 'भय' ही वेब सीरिज रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. जर तुम्हाला हॉरर थ्रीलर असं काही पाहायचं असेल तर, तुमच्यासाठी ही उत्तम पर्याय ठरेल. नुकताच प्रदर्शित झालेली 'भय' ही सीरिज लोकांना घाबरवते आणि समीक्षकांकडूनही या सीरिजला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

एक अशी कथा जी, तुम्हाला हादरवून टाकेल

'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' ही वेब सीरिज एका थंडगार शवगृहाच्या सीनपासून सुरू होते, जिथे गौरव तिवारीचं शवविच्छेदन सुरू आहे. सुरुवातीला पोलीस ती आत्महत्या असल्याचं गृहीत धरतात, पण त्यानंतर त्याच्या मानेवर आढळलेल्या विचित्र खुणा कथेला वेगळ्या दिशेनं घेऊन जातात. त्यानंतर एका लेखकाची एन्ट्री होते, ज्या गौरवच्या जीवनावर पुस्तक लिहायचं आहे आणि तिथेच ही कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल की, एक पायलट होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण पॅरानॉर्मल दुनियेच्या खोलात कसा जातो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amazon MX Player (@mxplayer)

रहस्यमय मृत्यू अन् न सुटलेले प्रश्न

फ्लॅशबॅकमध्ये गौरवची इच्छा पायलट बनण्याची होती, पण एक दिवस, विमान चालवत असताना, त्याच्यासोबत असं काहीतरी घडतं, ज्यामुळे तो पॅरानॉर्मल एक्सपर्ट बनण्याचा निर्णय घेतो. या काळात, तो इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीमध्ये सामील होतो, जिथे तो इतर तीन लोकांसोबत काम करतो. सुरुवातीला, गोष्टी व्यवस्थित होतात, पण पाच वर्षांनी, विचित्र घटना घडू लागतात आणि गौरवचा गूढपणे मृत्यू होतो. 'भय' ही वेब सीरिज तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या सीरिजमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे पाहून अंगावर काटा येईलच, पण हात-पाय थरथरायला लागतील. 

उत्कृष्ट अभिनय अन् दमदार दिग्दर्शन

करण टॅकर, गौरव तिवारीला जिवंत करतो आणि त्याचा गंभीर दृष्टिकोन कथेला बळकटी देतो. त्याच्यामुळे कल्की कोचलिन, सलोनी बत्रा, दानिश सूद, शुभम चौधरी आणि निमिषा नायर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रॉबी ग्रेवाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, ज्यामध्ये भयपट आणि सस्पेन्सचं एक अनोखं मिश्रण आहे. 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका ओटीटीवरील भयपट प्रेमींसाठी एका मेजवानीपेक्षा कमी नाही.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2012 Erotic Thriller Film: प्रेमात धोका, तरुणी सूड उगवण्यासाठी बनली वेश्या; झोप उडवतो 'हा' सिनेमा, 13 वर्षांपूर्वीची सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सीअल फिल्म

महत्त्वाच्या बातम्या

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Embed widget