एक्स्प्लोर

Bharat Maza Desh Ahe Song : बच्चे कंपनीची धमाल; ‘भारत माझा देश आहे’मधील ‘हुतूतू हूतूतूतू' गाणं प्रदर्शित

‘भारत माझा देश आहे’ (Bharat Maza Desh Ahe ) चित्रपटातील ‘हुतूतू हूतूतूतू’ (Hutu Tu Tu Tu Tu) हे गाण प्रदर्शित झालं आहे.

Bharat Maza Desh Ahe  Song : भाषा जरी वेगळी असली तरी प्रत्येक शाळेत प्रतिज्ञा ही बोललीच जाते आणि हळूहळू या प्रतिज्ञेशी एक भावनिक नाते निर्माण होऊ लागते, जे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती निर्माण करते. अशाच देशभक्तीवर आधारित पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तसेच देशभक्ती जागृत करणारे एक गाणेहीझळकले. या गाण्याला भरपूर पसंती मिळाल्यानंतर आता ‘भारत माझा देश आहे’ (Bharat Maza Desh Ahe ) चित्रपटातील ‘हुतूतू हूतूतूतू’ (Hutu Tu Tu Tu Tu) हे धमाकेदार गाणे घेऊन आले आहे. या गाण्याला अथर्व श्रीनिवासन व विश्व झा जाधव गायले असून समीर सावंत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला आश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे. 

‘हुतूतू हूतूतूतू’मध्ये बालकलाकारांची धम्माल पाहायला मिळत आहे. हे गाणे राजविरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत आणि त्यांच्या मित्रांवर चित्रीत करण्यात आले आहे. आपल्या मित्रांसोबत दिवसभर चालणारी मजामस्ती, धमाल, भांडणे  या गाण्यातून दिसत आहे. हे गंमतीदार गाणे बालचमूला आवडणारे आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, “ ‘भारत माझा देश आहे’ देशभक्तीपर असला तरी त्यातून बोध घेण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. या गाण्यातून  लहान मुलांचा निरागसपणाही पाहायला मिळत आहे. अनेकदा लहान मुलांकडूनही शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. योगायोग म्हणजे हा चित्रपट आम्ही मे महिन्यात प्रदर्शित करत आहोत, ज्या महिन्यात लहान मुलांना सुट्टी असते. त्यामुळे पालक आणि पाल्य दोघेही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. यापूर्वीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या गाण्यालाही भरपूर व्युज मिळत आहेत.'' 

 एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे तर अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले आहे. तर नागराज यांनी छायांकनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शशांक शेंडे, छाया कदम, मंगेश देसाई, हेमांगी कवी, राजविरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar Sameer Wankhede: समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
Mahesh Manjrekar on Nana Patekar: 'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Embed widget