किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांची जुगलबंदी 'या' रोमँटिक गाण्यांमध्ये ऐकायला मिळाली...
Lata Mangeshkar Kishore Kumar Super Hit List : लतादीदी आणि किशोर कुमार यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली. याच सुपरहिट गाण्यांना एक उजाळा देऊयात.
Best Of Lata Mangeshkar & Kishore Kumar Songs : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज लतादीदी जरी आपल्यात नसल्या तरी मात्र त्यांच्या सुपरहिट गाण्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांचा मधुर आवाज चाहत्यांना फार प्रिय होता. किशोर कुमार आणि लतादीदी यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.
लतादीदी आणि किशोर कुमार यांची अनेक सुपरहिट गाणी आहेत. या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. "आप की आँखों में कुछ" पासून ते "नीले नीले अंबरपर्यंत" अनेक हिट गाण्यांमध्ये या दोन दिग्गज गायकांची जोडी जमली आहे. ही जुगलबंदी ऐकताना प्रेक्षकांनाही खूप दिलासा मिळाला आहे. लताजींच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना दु:ख झाले आहे. अशा वेळी त्यांच्या मधुर आवाजातील सूर ऐकून चाहते ते क्षण पुन्हा जगत आहेत. लताजी आणि किशोर कुमार यांच्या त्या सुपरहिट गाण्यांवर एक नजर टाकूया.
1. आप की आँखों में कुछ
2. भीगी भीगी रातों में
3. तुम आ गये हो नूर आ गया
4. तेरे बिना जिंदगी से
5. कोरा कागज था ये मन मेरा
6. देखा एक ख्वाब
7. लडकी है या शोला
संबंधित बातमी :
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी रेखासाठी गायली 'ही' सुपरहिट गाणी, आजही ती ऐकून मनाला शांती मिळते
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha