Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी रेखासाठी गायली 'ही' सुपरहिट गाणी, आजही ती ऐकून मनाला शांती मिळते
Lata Mangeshkar -Rekha : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्रीला लताजींचा आवाज असावा असे वाटत होते. पण हे सौभाग्य फार कमी अभिनेत्रींना मिळाले. या अभिनेत्रींपैकीच एक रेखा होती.
Top Songs Lata Mangeshkar Sang For Rekha : गानसम्राज्ञी या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना त्यांच्या मधुर आवाजासाठी नेहमीच लोकांचे प्रेम मिळत गेले. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्रीला लताजींचा आवाज असावा असे वाटत होते. पण हे सौभाग्य फार कमी अभिनेत्रींना मिळाले. या अभिनेत्रींपैकीच एक रेखा (Rekha) होती. रेखाच्या अनेक सुपरहिट गाण्यांमागे लताजींचा आवाज घुमला आहे. रेखा यांचे लताजींसोबत खूप छान बॉन्डिंग होते. लता मंगेशकरांच्या गाण्यांमुळे रेखा इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय झाली होती. रेखा आणि लताजी दोघीही एकमेकींच्या चाहत्या होत्या. आता आम्ही तुम्हाला अशा काही गाण्यांची यादी सांगणार आहोत ज्या गाण्यांमध्ये लताजींचा आवाज ऐकू आला आहे.
1. देखा एक ख्वॉंब - सिलसिला या चित्रपटातील हे गाणं असून या गाण्यात अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.
2. परदेसिया ये सच है पिया - मिस्टर नटवरलाल या चित्रपटातील गाण्यात अमिताभ आणि रेखा यांची जोडी फार खुलून दिसतेय.
3. चंदा देखे चंदा - राज बब्बर आणि रेखा यांच्या झूठी या चित्रपटातील हे गाणं प्रचंड गाजलं आहे.
4. मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को - या गाण्यात रेखाचं मनमोहक रूप चाहत्यांना फार आवडलं होतं.
रेखासाठी गायलेल्या या सुपरहिट गाण्यांमधला लतादीदींचा मधुर आवाज प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. केवळ रेखाच नाही तर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींच्या हिट गाण्यांमागे लताजींचा आवाज घुमला आहे. माधुरी दीक्षित, साधना, कतरिना कैफ, मधुबाला आणि काजोल यांच्या व्यतिरिक्त लताजींनी इतर अनेक अभिनेत्रींच्या कारकिर्दीत हिट गाणी दिली आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha