Bappi Lahiri : 'डिस्को किंग हरपला' ; बप्पी लाहिरींना सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
Bappi Lahiri : बप्पी लाहिरी निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
Bappi Lahiri : गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri ) काल यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बप्पी लाहिरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ए. आर रेहमान, विराट कोहली, अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री रविना टंडनने ट्वीट केले, 'तुमची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो, बप्पी दा, तुमची हटके शैली आणि नेहमी हसरा चेहरा कायम लक्षात राहिल.ओमशांती'
Grew up listening your music , Bappi da, you had your own style and always a smiling face . Your music shall play on forever .. OmShanti, Shanti, Shanti. 🙏🏻🕉🙏🏻 pic.twitter.com/Gl5XY3dPwh
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 16, 2022
विराट कोहलीने कू वर पोस्ट शेअर केली आहे. 'म्यूझिक इंडस्ट्रीमधील आयकॉन बप्पी लाहिरी यांच्या आत्म्याला शांती लाभो', असं त्याने लिहिले आहे.
'बप्पी लाहिरी हे हिंदी चित्रपटसृष्टीचे डिस्को किंग होते' असं ट्वीट ए. आर रेहमान याने केले आहे.
#RIPbappida …..Bappi Lahiri, the Disco King of Hindi cinema! https://t.co/MEXMxtnuWi
— A.R.Rahman (@arrahman) February 16, 2022
अक्षय कुमारनं ट्वीटमध्ये लिहिले, ' संगीत क्षेत्रातील आणखी तारा निखळला. बप्पीदा तुम्ही आम्हाला तुमच्या गाण्यांमुळे नेहमी आनंदी केले, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. ओमशांती'
Today we lost another gem from the music industry… Bappi Da,your voice was the reason for millions to dance, including me. Thank you for all the happiness you brought through your music. My heartfelt condolences to the family. Om Shanti 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) February 16, 2022
अभिनेता अजय देवगणनं देखील ट्वीट केलं आहे
Bappi Da was so endearing in person. But, his music had an edge. He introduced a more contemporary style to Hindi film music with Chalte Chalte, Suraksha & Disco Dancer.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 16, 2022
🕉 Shanti Dada🙏 You will be missed
इतर महत्त्वाच्या बातम्या:
PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?
Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास