Attack Movie : ‘या’ गोष्टींचे फॅन असाल, तर आवर्जून बघा जॉन अब्राहमचा ‘अटॅक’!
Attack Movie : जॉन अब्राहमसोबत 'अटॅक'मध्ये रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Sing) आणि जॅकलिन फर्नांडिसही (jacqueline Fernandez) मुखू भूमिका सकारात आहेत.
Attack Movie : अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abrajam) चित्रपट 'अटॅक' आज (1 एप्रिल) रिलीज झाला आहे. जॉन अब्राहमसोबत 'अटॅक'मध्ये रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Sing) आणि जॅकलिन फर्नांडिसही (jacqueline Fernandez) मुखू भूमिका सकारात आहेत. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर याचा दबदबा पाहायला मिळतोय. 'अटॅक' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या लक्ष्य आनंदने हा चित्रपट अतिशय विचारपूर्वक तयार केला आहे. आता जर तुम्ही देखील बॉलिवूड अॅक्शन चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट आवर्जून पहिलाच पाहिजे. शिवाय ‘या’ गोष्टींसाठी देखील हा चित्रपट पाहून शकता.
- अॅक्शन थ्रिलर
'अटॅक' हा एक साय-फाय ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये चाहत्यांना अॅक्शनसह साहसी कथा पाहायला मिळेल. याला देसी सुपरपॉवर हिरो चित्रपट असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- सुपरसोल्जर
असे म्हटले जात आहे की, जॉन अब्राहम सतत अॅक्शन चित्रपट करताना दिसत आहे. त्याच्या या अवताराला प्रेक्षक कंटाळले आहेत, पण यावेळी तो या अॅक्शनला एक नवीन तडका देणार आहे. तो एका सुपरसोल्जरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा अवतार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
- हा चित्रपटाचा पहिला भाग
हा 'अटॅक' चा पहिला भाग आहे. म्हणजेच प्रेक्षकांना त्याचा पुढचा भागही पाहायला मिळणार आहे. पहिला भाग पाहिल्यानंतरच चाहत्यांना या फ्रँचायझीचा नवीन चित्रपट समजू शकेल. अशा परिस्थितीत 1 एप्रिलला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना चित्रपटगृहात जावेच लागणार आहे.
- हटके संकल्पना
या चित्रपटात रकुलप्रीत एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने अशी चिप विकसित केली आहे जी, मानवी मेंदूमध्ये बसवली जाते. शास्त्रज्ञांनी त्याला IRA (इंटेलिजेंट रोबोटिक असिस्टंट) असे नाव दिले आहे. आता अर्जुन (जॉन अब्राहमचे पात्र) या चिपच्या मदतीने शत्रूंपासून कशी सुटका करेल आणि हा रोबोट कसा काम करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
- डेब्यू चित्रपट
लक्ष्य राज आनंद पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. याआधी तो ‘एक था टायगर’ आणि ‘बँग बँग’ सारख्या मोठ्या अॅक्शन चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक होता. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. आता लक्ष्यच्या दिग्दर्शनाचा हा चित्रपट कसा असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातून तो इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावणार आहे.
हेही वाचा :
- PHOTO : छोट्या पडद्यावरच्या ‘नागिन’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, तेजस्वी प्रकाशचे नवे फोटो पाहिलेत?
- Ranbir Alia Wedding : रणबीर कपूरनंतर आलिया भट्टनेही लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा! म्हणाली ‘हे वर्ष...’
- Shweta Tiwari : नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून श्वेता तिवारीने घेतला होता घटस्फोट, म्हणाली ‘त्याच्यासोबत आयुष्य म्हणजे...’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha