एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Multibagger Stock : 39 रुपयांचा स्टॉक बनला मल्टीबॅगर, 6 महिन्यात पैसे दुप्पट , गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stock :आयटी आणि फायनान्शिअल कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेत.
मल्टीबॅगर स्टॉक
1/5

आयटी फायनान्शिअल सेक्टरमधील कंपनी Spice Lounge Foods Works LTD च्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे 6 महिन्यात दुप्पट झाले आहेत. कंपनीचा स्टॉक सध्या 50 रुपयांच्या खाली आहे.
2/5

3 सप्टेंबरला या कंपनीचा शेअर 50.94 रुपयांवर पोहोचला होता. 7 ऑक्टोबर 2024 ला कंपनीचा स्टॉक 4.83 रुपयांवर होता. कंपनीचं बाजारमूल्य 2729 कोटी रुपयांवर आहे. गेल्या तीन वर्षात या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 1021 टक्के आणि 5 वर्षात 3246 टक्के परतावा दिला आहे.
3/5

गेल्या सहा महिन्यात या स्टॉकनं गुंतवणूकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा स्टॉक 10.98 रुपयांवर होता. 3 ऑक्टोबरला हा स्टॉक 39.94 रुपयांवर पोहोचला आहे. सहा महिन्यात हा स्टॉक 263 टक्क्यांनी वाढला आहे.
4/5

Spice Lounge Food Works LTD च्या शेअरनं वर्षभरात 710 टक्के परतावा दिला आहे. जूनच्या शेअर होल्डिंगच्या पॅटर्न नुसार कंपनीत 100 टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांचा आहे. मार्च 2025 मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये स्पिल्ट झाली होती. एका शेअरचे 10 भाग करण्यात आले होते, ज्यामुळं दर्शनी किंमत 10 रुपयांवरुन 1 रुपयांवर आळी आहे.
5/5

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 05 Oct 2025 10:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























