(Source: ECI | ABP NEWS)
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याने तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Nanded: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीने शेतकरी पार कोलमडून गेला आहे. शेतात भयावह आणि चिंताग्रस्त अशी स्थिती आहे. अशा या स्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आणि हलाखीच्या परिस्थितीला मात करत नांदेडच्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाने परदेशात नोकरी मिळवली आहे. (Nanded News) जयपाल शिरदे अस नाव असून त्याला अमेरिकेतील प्रसिद्ध हनवेल ऑटोमेशन कंपनीत नोकरी मिळाली आहे. महिण्याकाठी सात हजार 13 डॉलर म्हणजेच जवळपास सात लाख रुपये पगार मिळणार आहे. या सुखद बातमीने शेतकरी कुटुंबात आशेचा किरण निर्माण झाला आहे. तसेच मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याने तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. (American Dream Success Story)
ZP शाळेत शिकला, लातुरात कॉलेज केलं
जयपाल शिरदे हा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तकबीड या छोट्याश्या गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील गणेश शिरदे हे शेतकरी असून पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांना तीन मुलं देखील आहेत. हलकीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवले. जयपाल याच प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाल. त्यानंतर माध्यमिक शिक्षण परिमल महाविद्यालयात लातूर येथे पूर्ण केले. 2021 मध्ये जळगाव येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बी टेक पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकीत ऑटोमेशन कंपनीत नोकरी लागली.
महिन्याकाठी सात लाख रुपये पगार मिळणार
एवढ्यावरच न थांबता जयपाल यांने विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगत प्रयत्न सुरूच ठेवले. काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या हनवेल ऑटोमेशन कंपनीकडून चेन्नई येथे मुलाखती घेण्यात आल्या. देशभरातून शेकडो उमेदवार आले होते. त्यात जयपाल शिरदे हा एकमेव पात्र ठरला. हनवेल ऑटोमेशन ही सॉफ्टवेयर कंपनी टेक्सास राज्यातील डलास येथे कार्यरत असून अमेरिकेत प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे जयपाल याला महिन्याकाठी सात लाख रुपये पगार मिळणार आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.नायगाव तालुक्याला ही शेती पिकाला फटका बसला आहे. शेतकरी हतबल झाले असून त्यातच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने यशाचे शिखर पार करत आई वडिलासोबतच नांदेडचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
हेही वाचा

























