एक्स्प्लोर

सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल

शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण, सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्या आहेत

सोलापूर : राज्यातील मराठवाड्यात गेल्या 8 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी, आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी, सरकारवर जोरदार टीका करत, माजी सहकारी आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनाही जोरदार टोला लगावला. धाराशिवमध्ये राणी बारकूल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत, त्यांच्या सासऱ्याला अतिवृष्टीमुळे धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या भगिनीची समजूत घालून त्यांचे उपोषण सोडायला लावले. तसेच, येथील पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.

शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण, सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्या आहेत. पिकांची गिनती करता येणार नाही, अशी स्थिती आहे. जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचेही शेट्टींनी म्हटले.

जनतेचे, शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला रहाव्यात यासाठी सरकारने काही माणसं पेरली आहेत. जी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करतात आणि विषय दुसरीकडे नेतात, माध्यम देखील यातून सुटलेले नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीका केली. तसेच, सदाभाऊ खोत यांनाही खोचक टोला लगावला. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाठी प्राण देऊ, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते. त्यावर, प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, ज्यांना ज्यांना प्राण द्यायचं आहे, त्यांना देऊन टाका म्हणा लवकर, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल एकदाचा, असा खोचक टोला शेट्टींनी लगावला. तसेच, प्राण द्या म्हणा एकदा, आम्हाला त्यांची निष्ठा तपासायची आहे, असेही त्यांनी म्हटले. 

फडणवीसांनी अमित शाहांना यादी द्यावी

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायत निधीच्या फंडावरुन साखर कारखान्यांना इशाराच दिला आहे. शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादीच माझ्याकडे आहे, असे फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यावरुन, राजू शेट्टींनी पलटवार केला आहे. शरद पवारांना ही यादी कशाला देता, अमित शाह यांना द्या, असे राजू शेट्टींनी म्हटले. तसेच, तुम्ही कारवाई करा? पवारांना यादी देऊन काय करणार ते काय सत्तेत आहेत का? असा सवाल देखील राजू शेट्टींनी विचारला. सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का? हे तपसायला पाहिजे. एकनाथ शिंदे याना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे. अजित पवार यांच्या लीला काय सांगाव्यात? असे म्हणत दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी बरोबरच म्हटलं हे सगळे बनियापेक्षा मोठं आहेत, बिहारमध्ये निवडणुका असल्याने तिथं केंद्राने जास्त मदत केली. पण, सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्र भरत असला तरीही येथे मदत दिली जात नाही, कारण गृहीत धरलं जातं आहे, असेही राजू शेट्टींनी म्हटलं.

हेही वाचा

फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pre-Poll Vigilance: 'गुंड, समाजकंटकांबरोबर शक्तिप्रदर्शन करू नका', Dhule पोलिसांचा इशारा
Sena vs Sena: 'सरकार दगाबाज', Uddhav Thackeray यांचा घणाघात, आजपासून Marathwada दौरा सुरू.
Solapur Floods: 'ही कसली पाहणी?' केंद्रीय पथकाचा अंधारात टॉर्च लावून पाहणीचा फार्स, शेतकरी संतप्त
Mumbai Election : 'निवडणुका जिंकण्यासाठी BJP धर्माचं कार्ड वापरतंय', विरोधकांचा पलटवार
Dhule Elections: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर बॉडीबिल्डर्सना पोलिसांची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Embed widget