एक्स्प्लोर

Ashwini Mahangade Shared Emotional Post On Social Media: 'आपल्या सोबतचा माणूस अचानक आत्महत्या करतो आणि...'; मराठी अभिनेत्रीची वास्तव सांगणारी पोस्ट

Ashwini Mahangade Shared Emotional Post On Social Media: मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत आहे. अश्विनी नेहमीच अनेक विषयांवर व्यक्त होत असते. अशातच अश्विनीनं कलाकारांच्या आत्महत्येसंदर्भात इन्स्टाग्रामवर एक भावूक पण भयाण वास्तव सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

Ashwini Mahangade Shared Emotional Post On Social Media: नुकतीच एका मराठी कलाकारानं (Marathi Celebrity) टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्यानंतर अख्खी मराठी सिनेसृष्टी हादरली. आपल्यातल्याच एकानं, आपल्या सहकाऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळताच, सिनेसृष्टीतील प्रत्येकजण हळहळला. मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरच्या (Tushar Ghadigaonkar) मृत्यूनंतर अनेकांनी भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या पोस्ट चर्चेत आल्यात. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे, ती मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिची. अश्विनीनं इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट वाचून काळजात चर्रर्र होतं. 

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत आहे. अश्विनी नेहमीच अनेक विषयांवर व्यक्त होत असते. अशातच अश्विनीनं कलाकारांच्या आत्महत्येसंदर्भात इन्स्टाग्रामवर एक भावूक पण भयाण वास्तव सांगणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या अश्विनीची पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.  

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अश्विनीनं काय लिहिलंय? 

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, "आनंदी, समाधानी राहायचे म्हणजे नक्की काय करायचे हे समजले की सोप्पे होईल सगळे… बहुतेक… मी आनंदी आहे, मी समाधानी आहे हे जगाला दाखवण्यापेक्षा आधी आपल्या मनाला ते जाणवायला हवे. आपल्या सोबतचा, नेहमी आपल्याशी बोलणारा माणूस अचानक #आत्महत्या करतो आणि आपल्या हातात राहते ते फक्त आणि फक्त त्यावर हळहळ व्यक्त करणे…खरे तर नेमके आपण काय करायला हवे हे तरी कुठे समजते आपल्याला.. त्याने तो विचार किती वेळा मनात दाबला असेल, किती वेळा त्या पासून दूर पळालाही असेल पण कोणाशी बोलला असेल का ? त्याच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला कधीतरी त्या #कलाकाराच्या मनात खोल आत काय गोंधळ सुरू असतो याची जाणीव असेल का?"

View this post on Instagram
 
A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

"आत्महत्येचा विचार मनात आला तर त्यावर मात कशी करायची? नुसती पुस्तकं वाचून खरच हा विचार बाजूला जाईल का? मी काम शोधतोय/ शोधतेय.. हे वाक्य एवढे जड असेल का? किंवा ते बोलून किती वाट पाहिली असेल? आणि खरच तग धरून राहायला यायला हवे म्हणजे काय? ते कसे जमणार?", असंही अश्विनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलीय. 

"आत्महत्या हा शब्दच मला तिरस्कार करणार वाटतो. त्याची भयानकता माझ्या जवळचा माणूस जेव्हा आत्महत्या करून गेला तेव्हा समजली. तेव्हाही समजले नाही की मी काय करायला हवे होते आणि आजही समजत नाही आपण काय करायला हवे होते. शेवटी आपल्या गरजा कमी असायला हव्यात? फक्त एकाच कामावर अवलंबून राहून चालणार नाही यावर विचार करायला हवा?? आपल्या माणसांमध्ये जास्त वेळ घालवावा? का कोणीतरी म्हणायला हवे…. तू कशाला काळजी करतोस/करतेस मी आहे की….. Thank you so much @badrinathmahangade कारण हे म्हणणारा माझा भाऊ आहे माझ्या आयुष्यात...", असं अश्विनी म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pankaj Panchariya Post After Actor Tushar Ghadigaonkar Suicide: 'मृत्यूच्या काही दिवस आधी त्यानं माझ्याशी संपर्क केलेला, पण...' मराठी अभिनेत्यानं सांगितलं तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget