एक्स्प्लोर

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित; अजिंक्य देवसह तेजश्री प्रधानची सुंदर प्रेमकथा

अमोल शेटगे दिग्दर्शित आणि सचिन नाहर -अमोग मलाविया निर्मित हा चित्रपट 28 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस!

Asa mi ashi mi Marathi movie: मराठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा अमोल शेटगे दिग्दर्शित, सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित ‘आसा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर आणि भावनिक वळणांनी सजलेली आहे. ‘आसा मी अशी मी’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून या ट्रेलर ने एका प्रेमकथेला आंतरराष्ट्रीय उंची दिली आहे. 

यूकेमधील भव्य लोकेशन्स, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, आलिशान प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि मनाला भिडणारा रोमँस. या सर्वांचा मिलाफ असलेला हा चित्रपट निर्माता सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांच्या मोठ्या दृष्टीकोनाची झलक दाखवतो.

भव्य लोकेशन्स, ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली

या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो अभिनेते अजिंक्य रमेश देव एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. देखणा, स्टायलिश आणि थोडासा कॅसानोव्हा स्वभावाचा. त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम मोकळं, धडाडीचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं दाखवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते. लंडनच्या चमचमणाऱ्या लोकेशन्समुळे त्यांच्या प्रेमाची प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी सिनेमात पहिल्यांदाच इतक्या ग्रँड स्केलवर चित्रिकरण झाले असून, रोल्स रॉयसची लक्झरी, प्रसिद्ध हेरिटेज लोकेशन असलेला हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही वैभव आणि इतर अप्रतिम लोकेशन्समुळे प्रत्येक फ्रेमला भन्नाट आंतरराष्ट्रीय भव्यता लाभली आहे.

विशेष बाब म्हणजे चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला असून, ज्यूरी आणि प्रेक्षकांकडून त्याला विशेष दाद मिळाली.

सुंदर प्रेमकहाणी,सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार 

ट्रेलर मध्येही प्रेमकहाणी जिथे सुंदर उंची गाठते, तिथेच एक अनपेक्षित वळण दिसतं. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाताना दिसते. या निर्णयामागचं कारण काय? हे रहस्यच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतं.

अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. मुख्य कलाकारांसोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर यांसारखे दमदार आणि अनुभवी मराठी कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. ही भव्य निर्मिती मॅक्समस लिमिटेड या प्रतिष्ठित बॅनर्स अंतर्गत साकारली आहे. सिनेमाचे निर्माते सचिन नाहर आणि अनिश शर्मा तसेच सह निर्माते अमोग मलाविया, सुरेश गोविंदराय पै हे आहेत. उप-निर्माता आशा नाहर, डी ओ पी सोपान पुरंदरे, तर निलेश मोहरीर ह्यांनी सिनेमाला संगीत दिलय. येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला ‘असा मी अशी मी’चा सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे !

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
Embed widget