एक्स्प्लोर

AR Murugadoss On Sikandar Failure: आमिरसोबतचा 'गजनी' सुपरडुपर हिट, पण सलमान खानसोबतचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप; असं का? दिग्दर्शकानं सांगितलं धक्कादायक कारण

AR Murugadoss On Sikandar Failure: सलमान खानचा 'सिकंदर' हा या वर्षातील सर्वात मोठ्या फ्लॉपपैकी एक आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी चित्रपटाच्या फ्लॉपमागे एक धक्कादायक कारण सांगितले आहे.

AR Murugadoss On Sikandar Failure: 2008 मध्ये आमिर खानसोबत (Aamir Khan) 'गजनी' (Gajani Movie) सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट (Blockbuster Movies) देणारे दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास (Director A.R. Murugadoss) यांनी सलमान खानसोबत (Salman Khan) 'सिकंदर'ची (Sikandar Movie) घोषणा केली. तेव्हा लोकांना आशा होती की, आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा येणार आहे. दरम्यान, 'सिकंदर' गजनीसारखा जादू दाखवण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आता, 'सिकंदर' प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ चार महिन्यांनी, दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी सुपरस्टार सलमान खान असूनही 'सिकंदर' फ्लॉप का झाला? याचं कारण सांगितलं आहे. पण, दिग्दर्शकानं सांगितलेलं कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 

दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी सगळं खापर हिंदी भाषेवर फोडलं 

'मद्रासी' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, मुरुगदास यांनी सलमान खानच्या चित्रपटाच्या अपयशाबद्दल सांगितलं की, याचं कारण हिंदी न समजणं आहे. ते म्हणाले की, जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत चित्रपट बनवतो, तेव्हा ते आपल्याला बळ देतं. इथे काय घडतंय, हे आपल्याला माहिती आहे. आजकाल, एक ट्रेंड सुरू आहे आणि प्रेक्षक अचानक त्या ट्रेंडशी जोडले जातात. जेव्हा आपण भाषा बदलतो, तेव्हा आपल्याला कळत नाही की, तरुणांना त्या भाषेत काय आवडतं? आपल्याला फक्त अशी पटकथा हवी आहे, ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. मी एकदा तेलुगू चित्रपट घेऊ शकतो, पण हिंदी कदाचित आपल्यासाठी काम करणार नाही, कारण पटकथा लिहिल्यानंतर आपण त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करतो. नंतर ते हिंदीमध्ये भाषांतरित केलं जातं.

दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी सांगितलेलं कारण धक्कादायक... 

दिग्दर्शकानं पुढे म्हटलंय की, ते काय बोलत आहेत, याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो, पण नेमकं काय घडतंय, हे आपल्याला माहिती नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या अज्ञात भाषेत आणि ठिकाणी चित्रपट बनवता, तेव्हा तुम्हाला अपंग असल्यासारखं वाटतं. जणू काही तुमचे हातच नाहीत. माझा ठाम विश्वास आहे की,आपली ताकद आपण कुठून आणि कोणत्या संस्कृतीतून आलो आहोत, यावर अवलंबून असते.

हे वक्तव्य अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं, कारण 'सिकंदर' हा तमिळ चित्रपट निर्मात्यानं दिग्दर्शित केलेला एकमेव हिंदी चित्रपट नाही. तो अक्षय कुमारच्या 2014 मध्ये आलेल्या 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' चित्रपटाचा निर्माता देखील आहे, ज्याला 'गजनी' सारख्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'हॉलिडे'नं 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 180 कोटी रुपये कमावले होते.

दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांना नेटकऱ्यांनी घेरलं 

दिग्दर्शक मुरुगदास यांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दिग्दर्शक मुरुगदास यांच्या वक्तव्यावर टिका करताना एका युजरनं म्हटलंय की, "मग तुम्ही फक्त पैशाच्या लोभासाठी हिंदी चित्रपट का दिग्दर्शित करता?" तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "त्याला हे विचित्र काम करण्यास कोणी भाग पाडलं?" इतर कमेंटमध्ये लिहिलंय की, "मग हॉलिडे आणि गजनी ब्लॉकबस्टर कसे बनले? जर कथा स्ट्राँग नसेल तर आऊटपुट शून्य असेल, असं सबब सांगण्याची गरज नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: ऐश्वर्या, कतरिना सगळ्या नंतर, कधीकाळी 'ही' अभिनेत्री होती भाईजानच्या दिलाची धडकन; सायकलनं करायचा पाठलाग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget