Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: ऐश्वर्या, कतरिना सगळ्या नंतर, कधीकाळी 'ही' अभिनेत्री होती भाईजानच्या दिलाची धडकन; सायकलनं करायचा पाठलाग
Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: भाईजान ज्या अभिनेत्रीला लपून-छपून पाहायला, जिचा सायकल घेऊन पाठलाग करायचा, ती अभिनेत्री ना ऐश्वर्या राय आहे, ना संगीता बिजलानी...

Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) लवकरच वयाची 60 गाठेल, पण आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. साठीला टेकलेला या बॉलिवूडच्या सुपरस्टारबाबत चाहत्यांना कायम एक प्रश्न पडतो की, दबंग स्टार सलमान खान लग्न कधी करणार? आजतागायत अविवाहित असलेल्या सलमान खानची आजवर अनेक अफेअर्स झालीत, काही अगदी सीरिअस आणि काहीतर अगदी लग्नापर्यंत पोहोचलेली. असं असलं तरीसुद्धा एक अशी अभिनेत्री होती, तिच्यासाठी सलमान खान अगदी वेडा होता. मॉर्निंग वॉकवर सलमान खानला ती दिसलेली, तेव्हापासून तो तिच्यावर भाळलेला. एवढंच नाहीतर, चक्क सायकल घेऊन तो तिचा पाठलागही करायचा. आता तुम्हाला वाटेल ही अभिनेत्री ऐश्वर्या राय असेल किंवा संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)... नाहीतर कतरिना कैफ (Katrina Kaif)... की, सोमी अली (Somi Ali)... तर आम्ही तुम्हाला सांगतो भाईजान ज्या अभिनेत्रीला लपून-छपून पाहायला, जिचा सायकल घेऊन पाठलाग करायचा, ती अभिनेत्री यांच्यापैकी कुणीच नाही... मग कोण आहे ती सौंदर्यवती? जाणून घेऊयात सविस्तर...
बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणजेच, सलमान खान वयाच्या 59 व्या वर्षीही अविवाहित आहे आणि त्याचे चाहते अजूनही त्याच्या लग्नाची आशा बाळगून आहेत. सलमानच्या चित्रपट कारकिर्दीत, त्याचं नाव ऐश्वर्या रायच्या आधी आणि नंतर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण त्याचं कोणतंच प्रेमप्रकरण लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं नाही. एकदा सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापली गेली होती, पण बोहोल्यावर चढण्याआधीच लग्न मोडलं. पण, अशी एक सौंदर्यवती होती जिच्यावर भाईजान खूप भाळलेला, तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. ही सौंदर्यवती दुसरी, तिसरी कुणीच नसून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) आहे.
सायकल घेऊन पाठलाग करायचा सलमान खान...
सध्या सोशल मीडियावर 2014 चा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जेव्हा रेखा सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन 8 मध्ये पाहुणी म्हणून आलेली. त्यावेळी रेखानं सलमान खानची पोलखोल केलेली.
रेखानं बोलताना सांगितलं की, "सलमान खान 6-7 वर्षांचा असताना तिच्याशी फ्लर्ट करायचा. रेखानं व्हिडीओमध्ये सलमानला विचारलं की, 'मला सांग तू मला पहिल्यांदा कुठे भेटलास?' यावर सलमाननं लाजत-लाजत उत्तर दिलं की, "जेव्हा मी तारूण्यात प्रवेश केला तेव्हा...'. यानंतर रेखा म्हणाली की, 'तुला फक्त तेच आठवतंय का?', मग भाईजान आणखीच लाजला आणि म्हणाला की, हो, हो. यानंतर रेखा म्हणते, 'मी तुम्हाला सांगते, मी मॉर्निंग वॉकला जायचे आणि सलमान 6-7 वर्षांचा होता... त्यावेळी तो माझ्या मागे सायकलवरून येत असे, त्याला त्यावेळी माहीत नव्हतं की, तो माझ्या प्रेमात पडलाय, हे खरं आहे, कारण त्यानं त्यावेळी म्हटलं होतं की, मी मोठा झाल्यावर या मुलीशी लग्न करेन..."
View this post on Instagram
व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर लोकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका युजरनं लिहिलंय की, "आज मला कळलं की सलमान खान अजूनही अविवाहित का आहे?" दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "पण जर दोघांनी खरंच लग्न केलं असतं, तर एकत्र चांगले दिसले असते, जसं ते आता दिसतायत." तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, "दोघांचे (अमिताभ-ऐश्वर्या) प्रेम एकाच घरात आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























