एक्स्प्लोर

Apurva Nemlekar : 'तू शेवंता केलीस तर काही ग्रेट नाही केलंस...', निर्मात्यांनी सुनावलं अन् अपूर्वाने थेट 'रात्रीस खेळ चाले' मालिकाच सोडली!

Apurva Nemlekar : रात्रीस खेळ चाले ही मालिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तडकाफडकी सोडली होती. त्याचं कारण अपूर्वाने आता सांगितलं आहे.

Apurva Nemlekar  : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar ) ही 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेमुळे घराघरांत पोहचली. या मालिकेतील तिच्या शेवंता या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. आजही तिची बऱ्याचदा ओळख शेवंता या पात्रामुळेच होते. पण प्रसिद्धीच्या अगदी टोकावर असतानाच अपूर्वाने रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याविषयी अपूर्वाने नुकतच एका मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला आहे. 

अपूर्वाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने या मालिकेदरम्यान निर्मात्यांसोबत झालेल्या वादाविषयी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे ही मालिका तडकाफडकी सोडण्याचं कारणही सांगितलंय. 

अपूर्वाने काय म्हटलं?

कोणतं रिजेक्शन जास्त लक्षात राहिलं? असा प्रश्न अपूर्वाला विचारण्यात आला. त्यावर अपूर्वाने म्हटंलं की, 'आजही जेव्हा कुठे जाते तेव्हा लोकं शेवंता म्हणूनच हाक मारतात. पण त्या पात्राला जे रिजेक्शन मिळालं ते सगळ्यात जास्त मनाला लागंल आहे. त्या सिरिअलचे मेकर्स, जे तेव्हा चॅनल हेड होते, त्या मालिकेचे निर्माते त्यांनी मला एका वादांकीत मुद्द्यांमध्ये बोलताना म्हटलं होतं की, तू शेवंता केलीस ते काही ग्रेट नाही केलंस. दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीने ते केलं असतं तर ते छानच केलं असतं. कारण मुळात आमच्या लिखाणात ती मज्जा होती. जेव्हा तुम्ही जीव ओतून काम करत असता तेव्हा ते एका कलाकाराला लागतं.'

पुढे तिने म्हटलं की, 'बारा तासांचा प्रवास, झोप पूर्ण न करणं, हे सगळं करत ते पात्र उभारण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेता आणि तेव्हा तुम्हाला म्हटलं जातं, हे कुणीही करु शकतं.त्यावेळी ते मनाला खूप लागतं. मग माझं असं झालं की, आता ठिक आहे, मला बघायचंचय की कोणती अभिनेत्री इतक्या ताकदीने ही भूमिका साकारते. बरं फार काही नेक्स्ट लेव्हलच्या अपेक्षा नव्हत्या. बेसिक पैश्यांच्या अपेक्षा होत्या, ज्यावर माझं घर चालतं.'

View this post on Instagram
 
A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

ही बातमी वाचा : 

Kareena Kapoor Khan : जेव्हा करिनाने सैफविषयी पहिल्यांदा आपल्या बहिणीला सांगितलं, दोघांच्या नात्याबद्दल एकून 'अशी' झाली होती करिश्माची अवस्था

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sattar vs Danve Special Report :सत्तारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, औरंगजेबानं धमकावू नयेPolitical Leaders Property Special Report :  संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेटRashmi Shukla Special Report : शुक्लांना कधी हटवणार? पटोलेंचा सवालाचा बाॅम्बManoj Jarange Maratha Reservation :  मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Embed widget