(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Emblem Dispute : 'हा स्वतंत्र भारताचा सिंह, गरज वाटली तर...'; अशोक स्तंभाच्या वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
अशोक स्तंभावर सुरु असलेल्या वादावर अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
National Emblem Dispute : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते सोमवारी (11 जुलै) संसद भवनाच्या (Parliament House) इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर यावरून वाद निर्माण झाला होता. अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर अशोक स्तंभावरून टीका केली जात आहे. अशोक स्तंभावरील सिंहाची भावमुद्रा ही शांत, संयमी असल्याचे दिसते. तर, संसद भवनाच्या इमारतीवरील अशोक मुद्रा ही आक्रमक आणि क्रोधित असल्याचे, काहींचे मत आहे. आता या सर्व वादावर अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अनुपम खेर यांचे ट्वीट
अनुपम खेर यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अशोक स्तंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'अरे भावांनो, सिंहाला जर दात असतील तर ते दिसणारच ना, हा स्वतंत्र भारताचा सिंह आहे. गरज वाटली तर चावा देखील घेऊ शकतो. जय हिंद.' अनुपम यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
अरे भाई! शेर के दांत होंगे तो दिखाएगा ही! आख़िरकार स्वतंत्र भारत का शेर है। ज़रूरत पड़ी तो काट भी सकता है! जय हिंद! 🙏🇮🇳🙏 Video shot at #PrimeMinistersSangrahlaya pic.twitter.com/cMqM326P2C
— Anupam Kher (@AnupamPKher) July 13, 2022
नेत्यांनी केली होती टीका
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा,खासदार जवाहर सरकार, विचारवंत, लेखक दिलीप मंडल, आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी भवनाच्या इमारतीवरील अशोक स्तंभाबाबत ट्वीट शेअर करुन या अशोक स्तंभावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. नवीन संसदेच्या इमारतीवर असलेला अशोक स्तंभ 20 फूट उंच असून 9500 किलो वजनाचा आहे. हे अशोक स्तंभ तांब्याचे आहे.
अनुपम खेर यांचे आगामी चित्रपट
अनुपम खेर यांचा 523 वा चित्रपट आयबी 71 (IB 71) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुपम यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंग सुरूवात केली. त्यांच्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा:
- National Emblem Ashok Stambh : नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या सिंहावरून वाद, जाणून घ्या प्रकरण
- Anupam Kher : अनुपम खेर यांनी रिक्षामधून केली सफर; व्हिडीओ शेअर करुन म्हणाले, 'ड्रायव्हर दुबे जी आणि मुंबईचे रस्ते'
- Narendra Modi ,Anupam Kher : अभिनेते अनुपम खेर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; दिली आईनं पाठवलेली खास भेटवस्तू