Ankita Prabhu Walawalkar : कोकण हार्टेड गर्लची लगीनघाई, अशी आहे अंकिता-कुणालच्या लग्नाची पत्रिका; पहिला फोटो आला समोर
Ankita Prabhu Walawalkar : अंकिता प्रभु वालावकरच्या लग्नपत्रिकेचा फोटो सध्या समोर आलेला आहे.
Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अंकिता वालावकर (Ankita Prabhu Walawalkar) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता ही संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतच अंकिता आणि कुणालच्या लग्नाच्या पत्रिकेचा पहिला फोटोही समोर आल्याचं पाहायला मिळतंय. अगदी कोकणी टच असलेली अंकिता आणि कुणालची लग्नपत्रिका आहे.
सऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकित वालावलकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज होतं. त्यानंतर अंकिताने स्वत: देखील ती लवकरच लग्न करणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यातच आता तिने तिच्या लग्नाचं आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. तिने पहिलं आमंत्रण गावच्या देवाला दिलं असून त्याचाच फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
अंकिताच्या लग्नाची खास पत्रिका
केळीच्या पानाची डिझायन असलेली अंकिताची लग्नपत्रिका आहे. सध्या अंकिताची लग्नपत्रिका सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. केळीच्या पानातली ही पत्रिका अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. अंकिता वालावलकरचा होणारा नवराही एक कलाकार आहे. तो इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचं नाव कुणाल भगत आहे. कुणाल संगीत दिग्दर्शक आहे. त्याने अनेक गाणी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
अंकिताचे चाहते कुणालला ‘कोकण हार्टेड बॉय’ (Kokan Hearted Boy) या नावाने हाक मारतात. अंकिताने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी या कोकण हार्टेड बॉयसाठी खास पोस्टही शेअर केली होती. सध्या अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram