Australia vs India 4th Test : तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
Australia vs India 4th Test : कॅच ड्रॉप आणि नो बॉलच्या चुकांनी भारतीय संघाला अडचणीत आणलं आहे. ऑस्ट्रेलियाला 174 धावांवर गुंडाळण्याची सुवर्णसंधी होती, पण एका झेल ड्रॉपने ती हिरावून घेतली.
Australia vs India 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अतिशय रोमांचक खेळ झाला. भारतीय संघाची दुसऱ्या डावात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर घट्ट पकड होती, पण खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने शेवटच्या विकेटसाठी भक्कम भागीदारीने टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. तर पहिल्या डावात त्यांच्याकडे 105 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एकूण 333 धावांची आघाडी घेतली आहे. एकेकाळी 173 धावांवर 8वी विकेट घेत भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे केवळ 278 धावांची आघाडी होती.
- India win.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 29, 2024
- Australia win.
- Draw.
- Tie.
🚨 ALL 4 RESULTS POSSIBLE TOMORROW AT THE MCG...!!! 🚨 pic.twitter.com/4ekI4eKIe1
कॅच ड्रॉप आणि नो बॉलच्या चुकांनी टीम इंडिया बॅकफूटवर
कॅच ड्रॉप आणि नो बॉलच्या चुकांनी भारतीय संघाला अडचणीत आणलं आहे. ऑस्ट्रेलियाला 174 धावांवर गुंडाळण्याची सुवर्णसंधी होती, पण एका झेल ड्रॉपने ती हिरावून घेतली. डावातील 66 वे षटक मोहम्मद सिराजने टाकले होते. सिराजला लियॉनचा कॅच पकडण्याची संधी होती, त्याने हातही लावला, पण तो झेल पूर्ण झाला नाही. लायन तेव्हा केवळळ 5 धावा करून लियॉन खेळत होता. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने 41 नाबाद धावा केल्या होत्या. स्कॉट बाउलँड 10 धावा करून नाबाद राहिला. या दोघांमध्ये 10व्या विकेटसाठी 110 चेंडूत 55 धावांची नाबाद भागीदारी झाली. सिराजने झेल घेतला असता तर ही भागीदारी झाली नसती.
AUSTRALIA ENDS DAY 4 AFTER BEING 91/6 TO 228/9. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 29, 2024
- Day 5.
- 96 overs.
- Australia with a lead of 333 runs.
- India need 1 wicket & need to chase the target.
WE'RE IN FOR A BLOCKBUSTER MONDAY - GOOD LUCK, TEAM INDIA. 🇮🇳 pic.twitter.com/ch9I6vzTVx
बुमराहने शेवटच्या षटकात मोठी चूक केली
चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने खेळाचे शेवटचे षटक टाकले. या 82 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नॅथन लियॉन झेलबाद झाला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. राहुलने सुद्धा तो मोठ्या शिताफी पकडला. पण इथे बुमराहने मोठी चूक केली. नो-बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळे राहुलचा झेलही निष्फळ ठरला आणि लियॉनला दुसऱ्यांदा जीवनदान मिळाले. शेवटच्या दिवशी हा झेल किती जड जाणार हे पाहणे बाकी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या