Samantha Ruth Prabhu : ट्रोलर म्हणाला ‘ती तिच्या कुत्र्या-मांजरासोबत एकटीच मरेल’, सडतोड उत्तर देत समंथा म्हणते...
Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. पती-अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा प्रसिद्धी झोतात आली होती. यानंतर समंथानी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, आता ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केल्याने समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाळीव कुत्र्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोवर कमेंट करत ट्विटर हँडलवर समंथा रुथ प्रभूला एका ट्रोलरने वाईटरित्या ट्रोल केले. समंथाच्या एका पोस्टवर कमेंट करताना त्याने लिहिले की, ‘ती तिच्या कुत्रे आणि मांजरींसह एकटीच मरेल.’ यावर समंथानेही त्याला उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘असे झाले तर, मी स्वतःला भाग्यवान समजेन.’ समांथाच्या जबरदस्त उत्तरानंतर ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट डिलीट केले.
‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनय आणि फॅशनशिवाय ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे देण्यासाठी देखील ओळखली जाते. अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्यापासून नेटिझन्स तिला रोजच काहीना काही कारणाने ट्रोल करत आहेत. मात्र, सगळ्यांनाच चोख उत्तर देत अभिनेत्री त्यांची बोलती बंद करते.
चाहत्यांच्या प्रश्नांना बेधडक उत्तरं देणारी समंथा!
या आधीही एका नेटकऱ्यानं समंथाला अजब प्रश्न विचारला होता. त्याने विचारले की, 'Have you reproduced because I wanna reproduce you' या प्रश्नाला उत्तर देत समंथा म्हणाली, 'आधी reproduce हा शब्द वाक्यामध्ये कसा लिहायचा हे गूगलवर सर्च कर आणि मग प्रश्न विचार'. तर, दुसऱ्या नेटकऱ्यानं विचारलं की, 'तुला चित्रपटाचे दिग्दर्शन करायला आवडेल का?' या प्रश्नाला समंथानं उत्तर दिलं की, 'मी ही गोष्ट कधी शिकले नाही आणि मी आत्ताच याबद्दल काही सांगू शकत नाही.'
समंथाच्या एका चाहत्यानं तिला प्रश्न विचारला होता की, 'तु बरी आहेस का?' यावर समंथा म्हणाली, 'हो, मला हा प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे आभार'
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
