(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marilyn Monroe, Blonde Teaser Out : झगमगाटी आयुष्यामागची दुःखद कहाणी, मर्लिन मुन्रोंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज!
Marilyn Monroe : अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचे आयुष्य प्रत्येकासाठीच एक कुतूहल होते. त्याच्या मृत्युला इतकी वर्ष लोटली असतानाही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.
Blonde Teaser Out : अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचे आयुष्य प्रत्येकासाठीच एक कुतूहल होते. त्याच्या मृत्युला इतकी वर्ष लोटली असतानाही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचं आयुष्य नेहमी झगमगाटी दिसत असलं, तरी या मागे प्रचंड वेदना आणि दुःख लपलं होतं. मर्लिन मुन्रो यांच्या याच आयुष्याची कथा सांगणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाचे नाव ‘ब्लाँड’ (Blonde) असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
अभिनेत्री अॅना डी अरमास या चित्रपटात मर्लिन मुन्रो यांची भूमिका साकारताना दिसतायत. मर्लिन यांचे व्यक्तिमत्व असे होते, की जो कोणी त्यांना भेटला, तो प्रभावित झाल्याशिवाय राहिला नाही. या टीझरमध्ये चाहत्यांना आणि प्रेक्षकांना त्याच मर्लिन मुन्रोंची एक झलक पाहायला मिळते.
टीझरवरून लक्षात येईल चित्रपटाची भव्यता!
टीझरच्या सुरुवातीला मर्लिन मुन्रो साकारणारी अॅना म्हणते, 'कृपया, मला सोडून जाऊ नकोस', तर दुसरी व्यक्ती म्हणते, 'ती येत आहे'. ज्यानंतर लाईट्स, कॅमेरा आणि पत्रकार, छायाचित्रकार यांनी वेढलेला मर्लिन यांचा तो उडणारा स्कर्ट. त्यांच्या आयुष्यातील हा आयकॉनिक क्षण अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. हा क्षण क्वचितच कोणी विसरु शकेल. मर्लिन मुन्रोंच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट किती जबरदस्त आहे, याचा अंदाज या टीझरवरूनच लावता येतो.
पाहा टीझर
जॉयस कॅरोल ओटे यांच्या कादंबरीवर आधारित पटकथा आणि दिग्दर्शन डॉमिनिक यांनी केले आहे. हा चित्रपट हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री-मॉडेल मर्लिन मुन्रो यांचे रिअल आणि रील जीवन यावर प्रकाश टाकतो.
मर्लिन मुन्रोंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अभिनेत्री लहानाची मोठी एका अनाथाश्रमात झाली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. सुरुवातीपासूनच महत्त्वाकांक्षी असलेल्या मर्लिन यांची दुसऱ्या महायुद्धादरम्यान एका फोटोग्राफरशी भेट झाली, जिथून तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात झाली. नेटफ्लिक्सचा ‘ब्लाँड’ हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील डार्क बाजू अर्थात दुःखद बाजू प्रेक्षकांना दाखवणार आहे.
हेही वाचा :
- Kim Kardashian : क्रिस्टल्स निघाले, धागे तुटले! किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मार्लिन मुन्रोंच्या ड्रेसचं मोठं नुकसान
- Coffee With Karan Season 7 : कॉफी विथ करणचा 7 वा सिझन 'या' दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या कोण-कोण होणार सामील
- Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील एका सीनमुळे भडकले नेटकरी; चित्रपट बायकॉट करण्याची युझर्सकडून मागणी