कुली सिनेमात अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणारा बाल कलाकार आता झालाय मोठा बिझनेसमन
Child artist Ravi Valecha : कुली सिनेमात अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणारा कलाकार आता काय करतो? जाणून घेऊयात..

Child artist Ravi Valecha : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांमध्ये अनेक बाल कलाकारांनी त्यांच्या बालपणाची भूमिका साकारली, पण प्रेक्षकांचे विशेष प्रेम मास्टर रवी वलेचा यांच्यावर होते. कानांवर आलेले केस, गंभीर चेहरा आणि डोळ्यांतली निरागसता – जेव्हा ते पडद्यावर दिसायचे, तेव्हा प्रेक्षक त्यांना थेट अमिताभ बच्चन यांच्या बालपणाशी जोडायचे. त्यामुळे रवी वलेचाने ज्या ज्या चित्रपटांत अमिताभ यांचे बालपण साकारले, ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले – जसे ‘कुली’ आणि ‘अमर अकबर अँथनी’.
6 जून 1971 रोजी जन्मलेल्या रवी वलेचाने ‘फकीरा’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मनमोहन देसाई यांचा चित्रपट ‘अमर अकबर अँथनी’ मध्ये अमिताभ बच्चन यांचे बालपण साकारले. त्यानंतर ‘कुली’, ‘देशप्रेमी’, ‘शक्ती’, ‘मिस्टर नटवरलाल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
आज रवि वलेचा कदाचित अमिताभ बच्चन यांच्या इतके प्रसिद्ध नसतील, पण त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात मोठा ठसा उमटवला आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर त्यांनी कोट्यवधींचे उत्पन्न मिळवले.
एका मुलाखतीत रवि यांनी सांगितले की ते बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांच्या कुटुंबाला वाटत होते की ते शिक्षण घेऊन पुढे जावे. म्हणूनच त्यांनी ठरवले की अभिनयाबरोबर शिक्षणालाही प्राधान्य देतील.
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर रवी वलेचाने अनेक चित्रपटांत लहान भूमिका साकारल्या, काही टीव्ही शोजमध्येही सहभागी झाले. पण नंतर त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला.
अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून इंटरनॅशनल बिझनेस आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर रवि यांनी ठरवले की आता ते अभिनय सोडून उद्योगधंद्यात स्वतःसाठी संधी शोधतील. त्यांची ही धडपड यशस्वी ठरली आणि लवकरच त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला. आज रवी वलेचा हे हॉटेल इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांचा व्यवसाय 300 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा आहे.

आज रवी वलेचा केवळ एक यशस्वी उद्योजकच नाही, तर देशातील अनेक टॉप प्रायव्हेट बँकांना हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवतात. याशिवाय ते तरुणांना हॉस्पिटॅलिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि विविध स्किल्सची प्रशिक्षणही देतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाचे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचं निधन, वयाच्या 86 वर्षी घेतला अखेरचा श्वास
परिणीती चोप्रा कपिलच्या शो मध्ये आली अन् सासूची तब्बेत बिघडली, रुग्णालयात हलवलं, शूटिंग कॅन्सल
























