परिणीती चोप्रा कपिलच्या शो मध्ये आली अन् सासूची तब्बेत बिघडली, रुग्णालयात हलवलं, शूटिंग कॅन्सल
Parineeti Chopra Mother In Law : आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या आईची म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्राच्या सासूची प्रकृती खालावली आहे. परी-राघव 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका भागाचे शूटिंग करत असताना त्यांची प्रकृती बिघडली.

Parineeti Chopra Mother In Law : अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या सासूंची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिणीतीच्या सासू, म्हणजेच आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या आई यांची तब्येत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या शूटिंगदरम्यान अचानक बिघडली. खरं तर, परिणीती आणि राघव शोच्या एका भागासाठी शूट करत होते. त्याच वेळी त्यांच्या आईची तब्येत खराब झाली आणि त्यांना शूटिंग मध्येच थांबवावी लागली.
शूटिंगमध्ये व्यत्यय
तब्येत बिघडल्यामुळे राघव चड्ढा यांच्या आईंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे कपिल शर्मा शोचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. प्रोडक्शन टीम लवकरच कपलला नवीन शूटिंगची तारीख देणार आहे.
कपिलच्या शोमध्ये सलमान खान पहिल्या एपिसोडला हजेरी
द ग्रेट इंडियन कपिल शोचा तिसरा सीझन सध्या सुरू आहे. पहिल्या भागात सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी शोमध्ये हजेरी लावली आहे. आगामी भागात राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघंही दिसणार होते. त्यांनी शूटिंगची सुरुवातही केली होती. मात्र, दरम्यानच राघव यांच्या आईंची प्रकृती खालावली आणि शूटिंग थांबवून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
2023 मध्ये राघव-परिणीतीचं लग्न
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं लग्न 2023 साली झालं. त्यांनी उदयपूरमधील आलिशान द लीला पॅलेस हॉटेलमध्ये ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या शाही लग्नसोहळ्यात चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. ते दोघंही आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. 2023 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या प्रेमकथेबाबत उघडपणे बोललं आहे. राघव यांनी सांगितलं की, लग्न होण्याआधी ते दोघं गुपचूप भेटत असत.
परिणीती आणि राघव यांची पहिली भेट
'आप की अदालत' या कार्यक्रमात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी मोकळेपणाने संवाद साधला. शोमध्ये परिणीतीने सांगितले की, ती एका अवॉर्ड फंक्शनसाठी लंडनला गेली होती. तिथे राघवही होते. पण त्या वेळी परिणीतीला राघव कोण आहे हे माहिती नव्हतं, कारण ती राजकारण फारसं फॉलो करत नसे. परिणीतीच्या भावाने – शिवांगने तिला राघवशी भेटायला सांगितलं. त्यानंतर तिने राघवशी भेटण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी परिणीती आणि राघव सुमारे 10-12 लोकांसोबत एका टेबलवर होते. तिथे त्यांनी त्यांच्या करिअर, छंद यावर चर्चा केली. त्यानंतर राघवला भूक लागली आणि तो जेवायला लागला. राघवचा तो सहज, साधा स्वभाव पाहून परिणीती इम्प्रेस झाली. तिला वाटू लागलं – "हा तर चांगला मुलगा आहे, मी याच्याशीच लग्न करणार." त्यानंतर परिणीतीने राघवबद्दल ऑनलाईन शोध घेतला, कारण तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. राघवबद्दल जाणून घेतल्यावर तिने ठरवलं – "आता लग्न तर याच्याशीच करायचं!"
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : सळसळ करत चाललेला साप सोनू सूदने झटक्यात पकडला, गोणीत भरला अन् दिला खास संदेश






















