एक्स्प्लोर
अमित ठाकरे सपत्नीक साईचरणी लीन
अमित ठाकरे यांच्या सोबत अनेकांनी फोटोसेशन केल तर काहींनी सेल्फीही घेतले. कोणालाही नाराज न करता अमित ठाकरे यांनी वेळ दिला. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलण्याचं अमित ठाकरे यांनी प्रकर्षाने टाळलं आहे.
शिर्डी : अमित राज ठाकरे यांनी गुरुवारी (19 डिसेंबर) पत्नी मिताली आणि काही मित्रांसमवेत साई दरबारी हजेरी लावली.साई समाधीच मनोभावे दर्शन घेत सर्वांनी द्वारकामाई मंदीर आणि चावडीच ही दर्शन घेतल आहे. अमित आणि मिताली यांनी विवाह बंधनात अडकण्यापूर्वी साईबाबांच दर्शन घेतलं होतं.
विवाहानंतर दोघांनी पहिल्यांदाच साईदर्शनासाठी हजेरी लावली आहे. अमित ठाकरे यांच्या सोबत अनेकांनी फोटोसेशन केल तर काहींनी सेल्फीही घेतले. कोणालाही नाराज न करता अमित ठाकरे यांनी वेळ दिला. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलण्याचं अमित ठाकरे यांनी प्रकर्षाने टाळलं आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे 27 जानेवारीला परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला उद्योग क्षेत्रातील मंडळी आणि चित्रपट सृष्टीतल्या कलाकार तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील हळूहळू राजकरणात सक्रिय झाले आहे. अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्षाचे नेतृत्व केले नव्हते . एकीकडे हे होत असतानाच ठाकरे परिवारातील राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी देखील राजकारणाची बाराखडी गिरवण्यास सुरवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय राजकारण करण्यास सुरुवात केली होती. पक्षाच्या बैठका, सभेला उपस्थित राहणाऱ्या अमित ठाकरे यांनी कधी मैदानात उतरून थेट सहभाग घेतला नव्हता . मात्र आज नवी मुंबईत पालिका कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमित ठाकरे रस्त्यावर उतरले होते.
मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडेंच्या कन्या बी. जी. सोमानी आणि वांद्र्याच्या फॅशन इस्टिट्यूटमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं. राज यांची धाकटी कन्या उर्वशी ठाकरेंसोबत 'द रॅक' नावाचं बुटीक सुरु केलं. मिताली आणि उर्वशी सख्ख्या आणि पक्क्या मैत्रिणी असल्यामुळे मितालीचं कृष्णकुंजवर येणं जाणं सुरुच होतं. त्यामुळे सासरेबुवा राज ठाकरे आणि सासूबाई शर्मिला ठाकरेंना अमित-मितालीच्या नात्याची आधीच कुणकुण लागली होती. अमित आणि मितालीने आपल्या प्रेमाबद्दल घरात सांगितलं आणि दोन्ही कुटुंबांनी होकारही दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement