Alia Bhatt Attack On Saif Ali Khan: सैफ अली खानवर आलिया भट्टनं केलाय हल्ला? Viral VIDEO चं सत्य समोर, चाहत्यांमध्ये खळबळ
Alia Bhatt Attack On Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला त्या आरोपीनं नाहीतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
Alia Bhatt Attack On Saif Ali Khan: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि अवघी इंडस्ट्री हादरली. अशातच चोरट्यानं केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालयानं दिली. पण, सध्या सैफवर हल्ला नेमका कुणी केला? खरंच सैफवर हल्ला झाला? सैफवर हल्ला करण्यात आलेला आरोपी आणि अटक करण्यात आलेल्या व्यक्ती फार वेगळ्या दिसतात, खऱ्या आरोपीला पकडलं ना? की हा भलताच कुणीतरी? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच, सध्या या प्रकरणाबाबत एक दावा केला जातोय, तो म्हणजे, सैफ अली खानवर हल्ला त्या आरोपीनं नाहीतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) केला. नेटकरी दावा कोणत्याही पुराव्या अभावी नाहीतर, एका व्हिडीओच्या आधारावर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर सैफ अली खान (Saif Ali Khan), करिना कपूर (Kareena Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहताच क्षणी कळतंय की, हा व्हिडीओ फेक आहे. पण, सध्या सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरत आहे. सध्या AI चा जमाना आहे, असं गमतीनं म्हटलं जातं. व्हायरल होणारा व्हिडीओही एआयची कमाल आहे. दररोज म्हटलं तरी, सेलिब्रिटींचे मॉर्फ व्हिडीओ, एआय व्हिडीओ समोर येत असतात. जे लोकांना अक्षरशः भंडावून सोडतात. हा व्हिडीओदेखील तसाच आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहताना हा व्हिडीओ फेक असल्याचं समजतं. पण, जर तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर कॉन्ट्रोवर्सीला जागा आहे. व्हिडीओमध्ये सैफ अली खान-करीना कपूर आणि रणबीर-आलिया एकत्र दिसत आहेत. मग अचानक आलिया भट्ट सैफ अली खानवर हल्ला करते आणि त्याला मारण्यास सुरुवात करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पण, हा व्हिडीओ पूर्णपणे फेक असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करुन त्याच्या मणक्याजवळ रुतलेला चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढण्यात आला. त्यानं पाच दिवस वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर तो त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ
सैफ अली खानवर त्याच्या वांद्र्याच्या सद्गुरू शरण इमारतीत असलेल्या पेंट हाऊसमध्ये त्याची पत्नी करिना कपूर खान आणि दोन मुलं तैमूर आणि जेह यांच्यासोबत राहतो. याच घरात घुसून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. रुग्णालयातून परतल्यानंतर सैफ आणि खान कुटुंबीयांनी त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी अभिनेता रोनित रॉयच्या सिक्युरिटी एजन्सीनं घेतली आहे.
चाकूचे तीन तुकडे पोलिसांच्या ताब्यात
सैफ अली खानवर चोरट्यानं ज्या चाकूनं हल्ला केला होता, त्या चाकूचे तीन तुकडे झाले होते. त्यापैकी एक तुकडा सैफच्या मणक्याजवळ रुतला होता. लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन हा तुकडा काढण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या वतीनं दावा केला की, त्यांनी अभिनेत्याच्या अपार्टमेंटमधून चाकूचा दुसरा तुकडा आणि शेवटचा तुकडा वांद्रे तलावाजवळून जप्त केला आहे, जिथे आरोपीनं पळून जाताना तो फेकला होता.