Kareena Kapoor Statement On Akshaye Khanna: 'अक्षय खन्ना खूप क्युट, मी वेडीय त्याच्यासाठी...'; 'धुरंधर'मधला रहमान डकैत गाजल्यानंतर करिना कपूरचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Kareena Kapoor Statement On Akshaye Khanna: 2004 च्या 'हलचल' सिनेमात करिना कपूर आणि अक्षय खन्नानं एकत्र काम केलेलं. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kareena Kapoor Statement On Akshaye Khanna: 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमात अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) रहमान डकैतची (Rehman Dakait) भूमिका साकारुन अक्षय खन्ना अवघ्या देशभरात चर्चेचा विषय ठरला. अक्षय खन्नानं साकारलेली रहेमान डकैतची भूमिका चित्रपटातील इतर स्टार कास्टवरही भारी पडली. सिनेमात मुख्य भुमिकेत रणवीर सिंह (Ranveer Singh) झळकला आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा रंगली आहे, अक्षय खन्नाची. रहमान डकैतच्या भूमिकेला अक्षय खन्नानं त्याच्या अभियन कौशल्यानं चार चाँद लावले. केवळ अक्षयच्या अभिनयानंच नव्हे तर बलुच गाण्यावरील Fa9la या गाण्यावरील त्याच्या नृत्यानंही सर्वांनाच भुरळ घातली आहे. अशातच करिना कपूरचा (Kareena Kapoor) एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करिना कपूरनं अक्षय खन्नावर जी स्तुतीसुमनं उधळली आहेत, ती ऐकून नक्कीच सर्वांच्या भुवया उंचावतात. या व्हिडीओमध्ये बोलताना करिना सांगते की, ती अक्षय खन्नाची एवढी मोठी फॅन होती की, तिनं त्याचा व्हिडीओ तब्बल 20 वेळा पाहिला होता.
2004 च्या 'हलचल' सिनेमात करिना कपूर आणि अक्षय खन्नानं एकत्र काम केलेलं. त्या काळात तिनं एका मुलाखतीत अक्षय खन्नाचं कौतुक केलेलं. शाळेत असताना तिला त्याच्याबद्दल किती वेड लागलेलं हे सांगताना करिनानं सांगितलं की, "अक्षय, मी बॅचलर आहे..." एवढंच काय तर, करिना असंही म्हणालेली की, हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी अक्षय खन्ना एकदम परफेक्ट आहे. करिना आणि अक्षय खन्ना '36 चायना टाऊन' सिनेमात एकत्र दिसलेले.
करिना कपूर अक्षय खन्नाबद्दल नेमकं काय म्हणालेली? (Kareena Kapoor Likes Akshay Khanna)
अक्षय खन्नाबद्दल बोलताना करिना कपूर म्हणालेली की, "अक्षयसाठी मी वेडी होते, मी बॅचरल आहे... असं सांगत फिरायचे... मी अक्षयचा 'हिमालय पुत्र' हा चित्रपट किमान 20 वेळा पाहिला आहे. त्या वेळी मी शाळेत शिकत होते आणि अक्षय खन्ना हा प्रत्येक मुलीचा क्रश होता... तो सर्वांचाच क्रश होता... मीही त्याच्यामागे अक्षरशः वेडी होते... अरे अक्षय खन्ना, अक्षय खन्ना, मी बॅचलर आहे... त्याच्यासाठीचं क्रेझ काहीसं असं होतं..." दरम्यान, अक्षय खन्नानं 1997 मध्ये आलेल्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलेलं.
"मला अक्षय खन्ना खूप आवडतो, तो खूप क्युट..." (Kareena Kapoor Akshay Khanna)
करिना कपूर पुढे बोलताना म्हणालेली की, "मला अक्षय खन्ना खूप आवडतो... जेव्हा मी त्याला पाहते... तो खूप क्युट दिसतो... तो खूप क्युट आणि चांगला माणूस आहे. तो खूप अद्भुत अभिनेता आहे. अक्षय खन्ना सर्वात परफेक्ट व्यक्ती आहे..., अक्षय खन्ना हॉलिवूडमध्ये जाण्यास पात्र आहे. त्याचा अभिनय थेट मनाला भिडतो..."
'हलचल' सिनेमात करिना कपूर, अक्षय खन्ना दिसलेले एकत्र
विशेष म्हणजे, अक्षय खन्ना आणि करीना कपूर यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित 'हलचल' (2004) या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'गॉडफादर'चा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात अक्षय आणि करीनासोबत सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी आणि परेश रावल यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :























